MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • EPF Salary Limit : 15000 वरून 25000 रुपये... पीएफच्या नव्या नियमाचा फायदा कोणाला? 17 सप्टेंबरपासून नियम लागू

EPF Salary Limit : 15000 वरून 25000 रुपये... पीएफच्या नव्या नियमाचा फायदा कोणाला? 17 सप्टेंबरपासून नियम लागू

EPF: आता पीएफसाठी पगाराची मर्यादा १५,००० रुपयांवरून २५,००० रुपये करण्यात आली आहे. यामुळे १५ ते २५ हजार रुपये पगार असणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना पीएफ, पेन्शन आणि विम्यासारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा थेट फायदा मिळणार आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 16 2026, 04:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
१५,००० ते २५,००० रुपये: नेमका बदल काय?
Image Credit : Chatgpt

१५,००० ते २५,००० रुपये: नेमका बदल काय?

खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ईपीएफओमध्ये (EPFO) अनिवार्य सहभागासाठी मासिक पगाराची मर्यादा १५,००० रुपयांवरून २५,००० रुपये करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सुमारे ५१ लाख नवीन कर्मचारी ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा जाळ्यात येतील. हा नवा नियम १७ सप्टेंबर २०२६ पासून लागू होणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
१५ ते २५ हजार पगार असणाऱ्यांना काय फायदा?
Image Credit : Asianet News

१५ ते २५ हजार पगार असणाऱ्यांना काय फायदा?

आतापर्यंत एखाद्या नवीन कर्मचाऱ्याचा पगार १५,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास, तो अनिवार्य ईपीएफ (EPF) कक्षेच्या बाहेर राहत होता. पण आता ही मर्यादा २५,००० रुपये केल्यामुळे, १५ ते २५ हजार रुपये पगार असणारे अनेक नवीन कर्मचारी ईपीएफच्या कक्षेत येतील. यामुळे त्यांना भविष्य निर्वाह निधी (PF), पेन्शन योजना आणि कर्मचारी विमा यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येईल.

Related Articles

Related image1
UPI Transaction Fee : यूपीआय व्यवहारांवरील शुल्कावर आरबीआयचं स्पष्टीकरण, 'डिजिटल पेमेंट मजबूत करण्यासाठी पाऊल'
36
मग सर्वांचाच पीएफ जास्त कापला जाणार का?
Image Credit : ChatGPT

मग सर्वांचाच पीएफ जास्त कापला जाणार का?

इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. २५,००० रुपये ही तुमच्या पगाराची नवीन कमाल मर्यादा नाही, तर ईपीएफमध्ये अनिवार्यपणे सामील होण्यासाठीची मर्यादा आहे. म्हणजेच, जर एखाद्याचा पगार १८,००० किंवा २२,००० रुपये असेल, तर त्याचा पगार २५,००० रुपये होणार नाही. तसेच, या घोषणेमुळे सर्वच कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात (In-hand salary) सारखाच बदल होईल असे नाही. पीएफचे योगदान किती असेल, हे कर्मचाऱ्याचा पगार आणि ईपीएफच्या नियमांवर अवलंबून असेल.

46
फक्त पीएफ नाही, पेन्शन आणि विमा पण मिळणार!
Image Credit : Gemini AI

फक्त पीएफ नाही, पेन्शन आणि विमा पण मिळणार!

या बदलाचा फायदा फक्त पीएफ खात्यापुरता मर्यादित नाही. ईपीएफओच्या कक्षेत येणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ईपीएस (EPS) द्वारे पेन्शन आणि ईडीएलआय (EDLI) द्वारे जीवन विम्याचे संरक्षणही मिळेल. म्हणजेच, नवीन पगार मर्यादेमुळे जास्तीत जास्त कर्मचारी बचत + पेन्शन + विमा या तिहेरी सुरक्षा चक्रात येतील. अर्थात, या सर्व सुविधा संबंधित योजनांच्या नियमांच्या अधीन असतील.

56
आधीपासून पीएफ असणाऱ्यांचे काय होणार?
Image Credit : Gemini AI

आधीपासून पीएफ असणाऱ्यांचे काय होणार?

जे कर्मचारी आधीपासूनच ईपीएफचे सदस्य आहेत, त्यांनी "मर्यादा १५ हजारांवरून २५ हजार झाल्यामुळे आपला पीएफ अचानक वाढेल" असा गैरसमज करून घेऊ नये. या निर्णयाचा मुख्य उद्देश १५ ते २५ हजार रुपये पगार असणाऱ्या आणि पीएफच्या कक्षेत नसलेल्या नवीन कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देणे हा आहे. त्यामुळे ज्यांचा पीएफ आधीपासूनच कापला जात आहे, त्यांच्यावर या बदलाचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक पगार आणि ईपीएफच्या नियमांनुसारच होईल.

66
१७ सप्टेंबरपासून नियम लागू.. ५१ लाख जणांना फायदा!
Image Credit : Asianet News

१७ सप्टेंबरपासून नियम लागू.. ५१ लाख जणांना फायदा!

२०१४ मध्ये ईपीएफसाठी पगाराची मर्यादा १५,००० रुपये निश्चित करण्यात आली होती. आता तब्बल १२ वर्षांनंतर ती २५,००० रुपये करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सुमारे ५१ लाख कर्मचाऱ्यांना अतिरिक्त फायदा होईल आणि यासाठी सरकारला सुमारे ११,३३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे १५ ते २५ हजार रुपये पगार असणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Recommended image2
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Recommended image3
Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Recommended image4
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी
Recommended image5
Retirement Planning : पगार फक्त 25 हजार? रिटायरमेंटपर्यंत जमा करा 1 कोटी रुपये, वाचा सोप्या टिप्स
Related Stories
Recommended image1
UPI Transaction Fee : यूपीआय व्यवहारांवरील शुल्कावर आरबीआयचं स्पष्टीकरण, 'डिजिटल पेमेंट मजबूत करण्यासाठी पाऊल'
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved