सार

Tips for Online Sale : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर फेस्टिव्ह सीजन सेलची सुरुवात होणार आहे. यावेळी ऑनलाइन पद्धतीने स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा फसवणुकीला बळी पडू शकता. 

Tips for Online Sale : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्राइम मेंबर्ससाठी सेलची सुरुवात झाली आहे. फेस्टिव्ह सीजनच्या सेलवेळी बहुतांशजण कमी किंमतीत आवश्यक प्रोडक्ट्स खरेदी करतात. तुम्ही देखील यंदाच्या फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या सेलवेळी खरेदी करण्याचा विचार करताय तर काही गोष्टींची काळजी घ्या. यावेळी चुकीचे प्रोडक्ट्स निवडल्यास तुमचेच नुकसान होऊ शकते.

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनचा सेल
फ्लिपकार्टचा(Flipkart) ‘द बिग बिलियन डेज’ (The Big Billion Days) आज रात्रीपासून लाइव्ह होणार आहे. याशिवाय अ‍ॅमेझॉनचा (Amazon) ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ (Great Indian Festival) सेलचा प्राइम मेंबर्सला लाभ घेता येणार आहे. उद्यापासून (27 सप्टेंबर) सर्वांसाठी अ‍ॅमेझॉनचा सेल लाइव्ह होणार आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोन ते घरातील अत्यावश्यक वस्तूंवर धमाकेदार सूट आणि डील्सचा फायदा घेता येणार आहे. मात्र सेलवेळी स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची काळजी जरुर घ्या.

ऑनलाइन सेलवेळी फोन कसा निवडावा?
ऑनलाइन सेलवेळी फोनची निवड करताना त्याच्या फीचर्सकडे लक्ष द्यावे. याशिवाय फोनमधील स्पेस किती दिला आहे याबद्दल पाहा. अन्यथा कालांतराने फोन हँग होऊ शकतो.

फोन एक्सचेंज होईल की नाही
बहुतांशवेळा सेलवेळी फोनवर धमाकेदार डील्स आणि सूट दिली जाते. पण फोन एक्सजेंच करु शकत नसल्यास तुमचेच नुकसान होऊ शकते. याशिवाय फोन काही दिवसानंतर बिघडला तरीही तुम्ही काहीही करू शकत नाही. यामुळे फोन खरेदी करताना त्यासाठी एक्सजेंचा पर्याय दिला आहे की नाही हे तपासून पाहा.

फोनबद्दल माहिती व्यवस्थितीत वाचा
ऑनलाइन सेलवेळी विक्री केल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्सबद्दल माहिती दिली जाते. काहीवेळेस वापरलेले फोन दुरुस्ती करुन पुन्हा सेलमध्ये लाइव्ह दाखवले जातात. अशातच वापरलेले फोन ऑनलाइन सेलमध्ये खरेदी करणे टाळावे.

फोनची किंमत तपासून पाहा
ऑनलाइन सेलवेळी सर्वाधिक महत्वाचे म्हणजे त्याची किंमत तपासून पाहा. वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील फोनच्या किंमतीत थोडाफार बदल असू शकतो. दोन प्लॅटफॉर्ममधील फोनच्या किंमतीची तुलना करुन खिशाला परवडणाऱ्या किंमतीत फोन खरेदी करा.

रिव्हू वाचा
स्मार्टफोन असो किंवा अन्य एखादे सामान ऑनलाइन खरेदी करताना त्याचा रिव्हू वाचा. प्रोडक्ट पाहिल्यानंतर रिव्हू वाचून त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती कळेल. यामुळे प्रोडक्ट्ससाठी खर्च केले जाणारे पैसे फुकट जाणार नाहीत ना याची देखील खात्री तुम्हाला पटेल.

आणखी वाचा : 

Samsung कंपनीच्या एक-दोन नव्हे तब्बल 4 फोनच्या किंमतीत 50 टक्के घट, वाचा ऑफर्स

पैशांचे आर्थिक नियोजन करण्यासाठी 5 खास टिप्स, रहाल टेन्शन फ्री