- Home
- Utility News
- Dog Bite first aid : कुत्रा चावल्यावर लगेच काय करावं?, तुमची एक चूक जीवावर बेतू शकते!
Dog Bite first aid : कुत्रा चावल्यावर लगेच काय करावं?, तुमची एक चूक जीवावर बेतू शकते!
Dog bite first aid : सगळीकडे भटक्या कुत्र्यांची भीती आहे. लहान मुलांपासून ते ऑफिसला जाणाऱ्या मोठ्यांपर्यंत कोणीही या दहशतीतून सुटलेले नाही. पण कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या जखमेपेक्षा त्यामुळे होणारा रेबीज हा संसर्गजन्य आजार जास्त धोकादायक आहे.

रेबीजसारख्या जीवघेण्या आजारांना कारण ठरू शकते
आजकाल भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत आहेत. यात अनेक लहान मुलांनी जीव गमावला आहे. फक्त भटके कुत्रेच नाही, तर प्रशिक्षण नसलेले पाळीव कुत्रेही कधीकधी हल्ला करतात. अनेकजण कुत्रा चावल्यास किरकोळ जखम समजून दुर्लक्ष करतात. पण असा निष्काळजीपणा रेबीजसारख्या जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरू शकतो, असा इशारा डॉक्टर देतात. तर, कुत्रा चावल्यावर प्रथमोपचार कसे करावे आणि वैद्यकीय मदत का गरजेची आहे, हे आता पाहूया.
कुत्रे हल्ला का करतात, याचीही काही कारणं आहेत
आजारपण -
जेव्हा कुत्र्यांना कोणताही आजार किंवा वेदना होत असतात, तेव्हा ते विचित्र वागतात.
संरक्षणाची भावना -
जेव्हा त्यांना पिल्लांना किंवा अन्नाला धोका वाटतो, तेव्हा ते हल्ला करतात.
रेबीजचा परिणाम -
रेबीजची लागण झालेले कुत्रे आपली सारासार विचारशक्ती गमावतात आणि समोर दिसेल त्याला चावतात.
कुत्रा चावल्यावर लगेच या गोष्टी करा
कुत्रा चावल्यानंतर आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी ही काळजी घ्या.
जखम स्वच्छ करा -
वाहत्या पाण्याखाली जखम धरा आणि सौम्य साबणाने सुमारे 5 ते 10 मिनिटे धुवा. यामुळे लाळेतील विषाणूची तीव्रता कमी होते.
रक्तस्त्राव थांबवा -
जखमेतून रक्त येत असल्यास, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी स्वच्छ कापडाने हलकेच दाबा.
Antibiotic क्रीम -
तुमच्याकडे उपलब्ध असल्यास जखमेवर अँटीबायोटिक क्रीम लावा.
बँडेज -
धूळ आत जाऊ नये म्हणून जखम Sterile बँडेज किंवा स्वच्छ कापडाने झाका.
डॉक्टरांशी संपर्क का साधावा?
कुत्रा चावल्यावर स्वतःच उपचार करू नका. डॉक्टरांकडे जाण्याचे अनेक फायदे आहेत.
संसर्ग टाळण्यासाठी टिटॅनसचे इंजेक्शन दिले जाते.
कुत्र्याला लस दिली आहे की नाही हे माहीत नसल्यास, चावलेल्या व्यक्तीला रेबीजची लस देणे बंधनकारक आहे.
जखम खोल असल्यास टाके घालायचे की नाही हे डॉक्टर ठरवतात.
ही लक्षणं धोकादायक
कुत्रा चावल्यानंतर ही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत.
जखमेवर तीव्र लालसरपणा, सूज किंवा वेदना वाढणे.
ताप येणे.
पाण्याची भीती वाटणे.
तीव्र डोकेदुखी किंवा गोंधळल्यासारखे होणे.
वेळेवर लसीकरण आवश्यक
रेबीजवर कोणताही इलाज नाही, प्रतिबंध हाच एकमेव मार्ग आहे. कुत्रा चावल्यानंतर लगेच लस घेतल्यास जीवघेण्या आजारांपासून 100% संरक्षण मिळू शकते. भट्या कुत्र्यांपासून सावध राहणे आणि पाळीव कुत्र्यांना वेळेवर लस देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

