डासांच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग आम्ही तुम्हाला एक सोपा आणि नैसर्गिक उपाय सांगत आहोत. कोणताही केमिकल, अगरबत्ती किंवा स्प्रे न वापरता डासांना पळवून लावण्याचा हा उपाय खूपच सोपा आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. हा घरगुती उपाय केल्यावर दोन मिनिटांत डास मरून पडतील.

How to Get Rid of Mosquitoes at Home: उन्हाळा आला की डासांचा त्रास हमखास सुरू होतो. गरमीमुळे आपण घराच्या खिडक्या, बाल्कनीचे दरवाजे उघडे ठेवतो, त्यामुळे डास सहज घरात शिरतात. डास चावल्यावर फक्त खाज किंवा लाल चट्टे येत नाहीत, तर मलेरिया, डेंग्यूसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. म्हणजे एक छोटासा डास माणसाला चांगलंच आजारी पाडू शकतो. तसं तर अनेकजण डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी वापरतात, जो सर्वात सुरक्षित उपाय आहे. पण दिवसभर कुणी मच्छरदाणीत बसू शकत नाही, हेही खरंय. तर काहीजण मॉस्किटो किलर अगरबत्ती, लिक्विड किंवा स्प्रे वापरतात, जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणाच्याच आरोग्यासाठी चांगले नाहीत. अशावेळी, आम्ही तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगत आहोत, जो वापरल्यास फक्त २ मिनिटांत डास स्वतः मरून खाली पडायला लागतील. जाणून घ्या डास पळवण्याचा हा सर्वात प्रभावी घरगुती उपाय.

डास पळवण्याचा सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय

  • सर्वात आधी एक मध्यम आकाराचा कांदा घ्या.
  • त्याचा वरचा आणि खालचा भाग कापून घ्या, जेणेकरून तो व्यवस्थित उभा राहील.
  • आता कांद्याच्या वरच्या भागात एक इंच गोलाकार छिद्र करा.
  • या छिद्रात दोन कापराच्या वड्यांची पावडर करून भरा.
  • त्यात कडुलिंबाची काही सुकलेली पानं चुरून टाका.
  • नंतर तीन-चार लवंगा जाडसर कुटून घाला.
  • आता कापसाची एक वात बनवा आणि ती कांद्याच्या छिद्रात ठेवा. वरून मोहरीचं तेल टाका.
  • आता ही वात पेटवा.
  • कांदा एका स्टीलच्या प्लेटवर किंवा अशा भांड्यावर ठेवा, जेणेकरून तो सहज इकडून तिकडे नेता येईल.
  • वात पेटवल्यानंतर दोन मिनिटांच्या आत घरात लपलेले डास मरून खाली पडायला लागतील.
  • कडुलिंबाची पानं, लवंग आणि कापूर यांचं मिश्रण डासांसाठी विषासारखं काम करतं. पण चांगली गोष्ट ही आहे की, ते माणसांसाठी खूप फायदेशीर आहे.
  • यामुळे घरात एक छान आणि फ्रेश सुगंधही पसरतो, जो मनाला शांत करतो.
  • अशाप्रकारे, तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील वस्तूंमधूनच कोणत्याही केमिकलशिवाय डासांना सहज दूर पळवू शकता.

याशिवाय, डासांना पळवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओमधील पद्धतही वापरू शकता. पाहा-

View post on Instagram