तुमच्या घरातली जुनी लाकडी किंवा प्लास्टिकची टोपली आता फेकून देऊ नका. त्यापासून एक सुंदर प्लांटर कसा बनवायचा, याच्या सोप्या टिप्स आणि डेकोरेशन आयडियाज जाणून घ्या. यामुळे तुमचं घर अधिक सुंदर आणि इको-फ्रेंडली दिसेल.

आपल्या किचनमध्ये अनेकदा बास्केट किंवा टोपल्या वापरल्या जातात. काही काळानंतर त्या जुन्या होतात किंवा कुठेतरी तुटतात. मग आपण त्या फेकून देतो. पण थांबा! या जुन्या टोपल्या फेकून देण्याऐवजी तुम्ही बागकामासाठी (gardening) त्यांचा भारी उपयोग करू शकता. हो, खरंच! लाकडी किंवा प्लास्टिकच्या टोपलीपासून प्लांटर बनवणं खूप सोपं आहे. तुमच्या बागेसाठी किंवा बाल्कनीसाठी ही एक बजेट-फ्रेंडली आयडिया आहे. योग्य पद्धतीने तयार केल्यास हा प्लांटर खूप काळ टिकतो. चला तर मग, पाहूया जुन्या किचनच्या टोपलीपासून प्लांटर कसा बनवायचा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

योग्य टोपली निवडा

तुमच्याकडे बांबू, लाकूड किंवा प्लास्टिकची जुनी किंवा थोडी तुटलेली टोपली असेल, तर आधी तिला मजबूत करा. टोपलीच्या आतमध्ये प्लास्टिकची शीट किंवा कोकोपीट लाइनर (cocopeat liner) लावा. लाकडी टोपलीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण पाण्यामुळे लाकूड खराब होऊ शकतं. टोपलीला वॉटरप्रूफ बनवून तुम्ही ती जास्त काळ वापरू शकता. यानंतर, टोपलीच्या तळाशी दोन-तीन छोटी छिद्रं पाडा, जेणेकरून जास्तीचं पाणी बाहेर निघून जाईल आणि झाडाची मुळं सडणार नाहीत.

मातीचं योग्य मिश्रण तयार करा

सर्वात आधी बागेतील माती, कंपोस्ट खत आणि वाळू १:१:१ प्रमाणात एकत्र करा. हे मिश्रण टोपलीत भरा, पण वर थोडी जागा रिकामी ठेवा. टोपलीच्या आकारानुसार तुम्ही त्यात लहान किंवा मोठी रोपं लावू शकता. लहान टोपली असेल तर मनी प्लांट, सक्युलेंट्स (succulents) किंवा हर्ब्स (herbs) लावा. रोप लावताना ते हलक्या हाताने लावा.

टोपलीला डेकोरेट करा

तुम्हाला टोपली अधिक सुंदर दिसावी असं वाटत असेल, तर तुम्ही तिला रंग देऊ शकता. याशिवाय रिबन, ज्यूट (ताग), लेस किंवा आरशांनीही तिला सजवू शकता. असं सजवल्यानंतर तुम्ही हा प्लांटर तुमच्या लिव्हिंग रूममध्येही ठेवू शकता. यामुळे तुमच्या घराची शोभा नक्कीच दुप्पट होईल.