Ashadhi Ekadashi 2025 : रविवारी आहे देवशयनी आषाढी एकादशी, जाणून घ्या काय करू नये?
मुंबई - दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी साजरी केली जाते. २०२५ मध्ये देवशयनी आषाढी एकादशी ६ जुलै, रविवारी येत आहे. या दिवशी दिवसभर उपवास धरला जातो. जाणून घ्या या दिवशी काय करावे, काय करु नये..
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
)
श्री महाविष्णू योगनिद्रेत असतात?
हिंदू धर्मानुसार एकादशी हा दिवस खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. त्यातल्या त्यात देवशयनी आषाढी एकादशीला विशेष स्थान आहे. दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणून साजरी केली जाते. २०२५ मध्ये देवशयनी आषाढी एकादशी ६ जुलै, रविवारी येत आहे. या दिवसापासून चातुर्मास व्रत देखील सुरू होते. हे व्रत चार महिने चालते. या चार महिन्यांत श्री महाविष्णू योगनिद्रेत असतात असे शास्त्र सांगतात. हा काळ भाविकांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या खूप शुभ मानला जातो.
या दिवशी मद्यपान आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य?
देवशयनी आषाढी एकादशीला उपवास केल्याने पुण्य मिळतेच, पण पापेही नष्ट होतात असे पुराणात सांगितले आहे. या दिवशी शक्यतो निर्जल उपवास करावा. उपवास करणे जड जात असेल तर दूध, फळे खाऊ शकता. पण भात, मीठ, धान्याचे पदार्थ टाळावेत. या दिवशी मद्यपान आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे.
दुसऱ्यांवर टीका करणे, रागावणे, भांडणे टाळावीत
या पवित्र दिवशी काही गोष्टी करणे दोषकारक मानले जाते. मुख्यत्वे..
तुळशीची पाने तोडू नयेत - तुळस ही श्री महाविष्णूंना प्रिय आहे. एकादशीला ती विश्रांती घेते अशी श्रद्धा आहे, म्हणून या दिवशी तुळशीची पाने पूजेत वापरू नयेत.
झाडू घराबाहेर टाकू नये - हे लक्ष्मी बाहेर जाण्याचे संकेत मानले जाते.
नखे कापू नयेत, केस कापू नयेत, शेव्हिंग करू नये - यामुळे अशुभ फल मिळते असा समज आहे.
दिवसा झोपू नये - हा दिवस ध्यानात घालवावा. झोपल्याने पुण्याचे फळ कमी होते.
दुसऱ्यांवर टीका करणे, रागावणे, भांडणे टाळावे. यामुळे आपल्याभोवती असलेली सकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते.
आत्म्याला शुद्ध करण्याची संधी
या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण, श्री सत्यनारायण व्रत, विष्णू अष्टोत्तर शतनामावली पठण केल्याने घरात शुभ होते. शक्य असल्यास मंदिरात किंवा घरी श्री महाविष्णूंची पूजा करावी. हळद, कुंकू, तुळस, नैवेद्य अर्पण करून भक्तिपूर्वक प्रार्थना करावी.
देवशयनी आषाढी एकादशी म्हणजे केवळ उपवास नाही, तर आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याची संधी आहे. शरीरासाठी विश्रांती आणि मनासाठी शांती देणारा हा पवित्र दिवस श्रद्धेने साजरा केल्यास आपल्या जीवनात शांती आणि समृद्धी येते. या एकादशीला आध्यात्मिक पुनरुज्जीवनाचा दिवस म्हणून पाहून स्वतःला रीचार्ज केले तर तीच खरी पूजा आहे असे म्हणता येईल.