- Home
- lifestyle
- Horoscope Guide : श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी शनि वक्री, या 3 राशींना बसेल मोठा फटका
Horoscope Guide : श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी शनि वक्री, या 3 राशींना बसेल मोठा फटका
मुंबई - श्रावण महिन्यात शिव आपला आशीर्वाद देतात. त्यामुळे श्रावणात कडक उपास पाळले जातात. काही जण केवळ सोमवार न करता संपूर्ण श्रावण पाळतात. पण यंदा काही जणांसाठी शनि विनाशाचे संकेत देतोय. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शनि वक्री होणार आहे. जाणून घ्या…

शनि वक्री: श्रावण सुरू होण्यापूर्वीच शनि वक्री होणार आहे. यामुळे सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होतील. शनि वक्री झाल्यामुळे ३ राशींच्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. या राशी कोणत्या ते जाणून घ्या..
श्रावण महिना जुलैपासून सुरू होऊन ऑगस्टपर्यंत चालतो. १३ जुलैपासून शनि वक्री होऊन २८ नोव्हेंबरपर्यंत उलट दिशेने फिरणार आहे. म्हणजेच श्रावण महिन्यात शनि वक्री असेल, जे ३ राशींच्या लोकांसाठी अशुभ ठरू शकते.
मिथुन: शनीची वक्री चाल मिथुन राशीच्या लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते. गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या काळात अशा स्वरुपाचे निर्णय टाळलेले बरे असेल.
मेष: या राशीच्या लोकांनी शनीच्या वक्री काळात खूप सावधगिरी बाळगावी. जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च तुमचे खिसे रिकामे करतील. वैयक्तिक जीवनात मतभेद आणि तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या काळात सावध राहा.
वृश्चिक: शनीची वक्री चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नुकसान आणि तणाव निर्माण करेल. तुमचे मन चंचल राहील. चुकीचे निर्णय घेण्यापासून दूर राहा. आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे यावेळी सजग राहा.

