Upcycling Ideas दूध किंवा ज्यूसचे रिकामे टेट्रा पॅक फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यापासून पेन स्टँड, बर्ड फीडर, मिनी पर्स, प्लांटर आणि घरासाठी सुंदर वस्तू बनवू शकता. जुन्या टेट्रा पॅकेटपासून काय काय भन्नाट गोष्टी बनवता येतात ते जाणून घ्या.

Old Milk Tetra Pack Reuse Ideas: तुम्ही पण दूध, ज्यूस किंवा इतर गोष्टींसाठी टेट्रा पॅक वापरता का? आणि संपल्यावर ते थेट कचऱ्यात फेकून देता? मग थांबा! आम्ही तुमच्यासाठी काही भन्नाट आयडिया आणल्या आहेत. या रिकाम्या पॅकेट्सचा वापर तुम्ही स्टोरेज, प्लांटर, बर्ड फीडर किंवा मुलांच्या क्राफ्टसाठी करू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मुलांसाठी बनवा पेन-पेन्सिल होल्डर

दूध किंवा फळांच्या ज्यूसच्या टेट्रा पॅकचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. सगळ्यात आधी पॅकेटला चांगलं स्वच्छ करून वाळवून घ्या. मग पॅकेट कापून त्यावर रंगीत कागद लावा किंवा पांढरा रंग देऊन त्यावर काहीतरी क्रिएटिव्ह डिझाइन काढा. याचा वापर तुम्ही पेन-पेन्सिल स्टँड म्हणून स्टडी टेबल किंवा डेस्कवर करू शकता.

टेट्रा पॅकपासून बनवा बर्ड फीडर

टेट्रा पॅकचा वापर तुम्ही पक्षांना दाणे देण्यासाठी किंवा त्यांचं छोटंसं घर बनवण्यासाठीही करू शकता. यासाठी टेट्रा पॅकला खिडकीसारखं कापून घ्या. त्याला छान रंग द्या आणि दोरी बांधून एखाद्या झाडावर लटकवा.

छोटंसं पाऊच किंवा पर्स बनवा

टेट्रा पॅकच्या पॅकेटचा वापर तुम्ही एक छोटी पर्स किंवा पाऊच बनवण्यासाठीही करू शकता. यासाठी वरचा भाग कापून चिकटवा. त्याला झिग-झॅग आकार द्या आणि झाकणाचा भाग वापरून एक छानसं मिनी बॅग तयार करा.

कुंड्या किंवा प्लांटर म्हणून वापरा

टेट्रा पॅकचा वापर तुम्ही मिनी प्लांटर म्हणूनही करू शकता. यासाठी खाली पाणी जाण्यासाठी छिद्र पाडा. हँगिंग पॉट बनवण्यासाठी वरच्या बाजूला दोरी लावा. त्यावर थोडं डिझाइन करा आणि त्यात गार्डन सॉइल टाकून कोणतंही छोटं रोपटं लावा.

टेट्रा पॅकच्या झाकणांचा वापर

फक्त पॅकेटच नाही, तर त्याच्या झाकणांचाही तुम्ही मस्त वापर करू शकता. त्यांना रंगवून त्यावर क्यूट स्माइली काढून तुम्ही की-चेन बनवू शकता. किंवा जर तुमच्याकडे भरपूर झाकणं असतील, तर त्यापासून फोटो फ्रेम बनवून तुमच्या टेबलवर ठेवू शकता.