सॅमसंग कंपनीचा हा प्रीमियम फोन मिळणार निम्म्या किंमतीत, आजच करा खरेदी
सॅमसंगच्या प्रीमियम फोनची किंमत १,२९,९९९ रुपयांवरून जवळपास ७०,००० रुपयांपर्यंत कमी झाली आहे. ही ऑफर ४ जानेवारीपर्यंत उपलब्ध असून, या फोनमध्ये २००MP कॅमेरा, ५०००mAh बॅटरी आणि ६.९-इंचाचा डायनॅमिक डिस्प्ले यांसारखी दमदार वैशिष्ट्ये आहेत.

सॅमसंग कंपनीचा हा प्रीमियम फोन मिळणार निम्म्या किंमतीत, आजच करा खरेदी
सॅमसंग कंपनीच्या प्रीमियम फोनची किंमत कमी झाली आहे. एस २५ हा फोन आता जवळपास निम्म्या किंमतीत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. सेलमध्ये हा फोन ४ जानेवारी पर्यंत आपण ऑफरमध्ये खरेदी करू शकणार आहेत.
फोन लॉंच झाल्यावर किती होती किंमत?
फोन लॉंच झाल्यावर त्याची किंमत १ लाख २९ हजार ९९९ च्या किंमतीत सादर करण्यात आला आहे. हा फोन आता जवळपास ७० हजार रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.
स्मार्टफोनचे काय आहेत फिचर
या स्मार्टफोनमध्ये अनेक फिचर देण्यात आले आहेत. या फोनमध्ये ६.९ इंचांचा डायनॅमिक डिस्प्ले देण्यात आला आहे. गेमिंग असो किंवा व्हिडीओ स्ट्रीमिंग यावर ग्राफिक्स चांगले असल्यामुळं आपण गेम खेळू शकाल.
किती देण्यात आली बॅटरी?
या डिव्हाइसमध्ये जवळपास ५००० एमएचची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये ४५ वॅट वायरलेस फास्ट चार्जिंग असल्यामुळं आपण हा फोन लवकरात लवकर चार्जिंग करू शकाल.
स्टोरेज किती मिळणार?
स्टोरेज जवळपास १२८ जीबी रॅम आणि डेटा वापरण्यासाठी १ टीबीपर्यंतचा डेटा आपण वापरू शकाल. या फोनमध्ये अँड्रॉइड १५ १५ वर आधारित सॅमसंगच्या नव्या वन युआय ७ वर आधारित असणार आहे.
कॅमेरा किती मिळणार?
या फोनमध्ये जवळपास २०० मेगापिक्सेलचा प्रमुख कॅमेरा देण्यात आला आहे. त्यानंतर ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेन्स देण्यात येणार आहे.

