iPhone Camera Tricks : आयफोनमध्ये उत्तम फोटोंसाठी या ५ सेटिंग्स नक्की बदला
तुम्हाला तुमच्या आयफोनमधून उत्तम फोटो काढायचे आहेत का? कॅमेरा सेटिंग्समधील ५ सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचे फोटो अधिक आकर्षक बनवू शकता. ब्राइटनेस सेट करण्यापासून ते प्रोफेशनल पोर्ट्रेट्स काढण्यापर्यंत या ट्रिक्स खूप कामी येतील.

आयफोन कॅमेरा सेटिंग्स!
तुमच्या आयफोनमध्ये एक जबरदस्त कॅमेरा असतो. पण अनेक युजर्स त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करत नाहीत. ॲपलने सोयीसाठी काही डिफॉल्ट सेटिंग्स दिलेल्या असतात. पण तुम्ही कॅमेऱ्याच्या इंटरनल सेटिंग्समध्ये थोडे बदल केले, तर तुमचे साधे फोटोही एकदम भारी दिसू शकतात. आम्ही तुमच्यासाठी ५ महत्त्वाच्या ट्रिक्स आणल्या आहेत. या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या फोटोंवर अधिक कंट्रोल मिळवू शकता आणि एकदम क्लिअर फोटो काढू शकता.

१. परफेक्ट ब्राइटनेससाठी एक्सपोजर सेट करा
तुम्हाला लगेच चांगले फोटो हवे आहेत का? मग एक्सपोजरवर कंट्रोल मिळवा. आयफोनचे ऑटो-एक्सपोजर सहसा चांगले काम करते, पण खूप उजेड किंवा अंधार असेल तेव्हा ते गडबडते. अशा वेळी आयफोनवर अवलंबून राहू नका. तुम्हाला जिथे फोकस करायचे आहे तिथे स्क्रीनवर टॅप करा. त्यानंतर तिथे दिसणाऱ्या सूर्याच्या आयकॉनवर बोट वर किंवा खाली सरकवा. बोट वर केल्यावर फोटो उजळतो आणि खाली केल्यावर डार्क होतो. या सेटिंगमुळे फोटोतील सब्जेक्टवर परफेक्ट प्रकाश पडतो आणि एक बॅलन्स्ड फोटो मिळतो.
२. उत्तम कंपोजिशनसाठी ग्रिड लाईन्स ऑन करा
प्रोफेशनल फोटोग्राफर्स इतके परफेक्ट आणि बॅलन्स्ड फोटो कसे काढतात? याचं रहस्य बेसिक कंपोजिशन टेक्निक्समध्ये दडलंय. आयफोनच्या 'ग्रिड' (Grid) फीचरमुळे हे खूप सोपे होते. हे टूल ऑन करण्यासाठी सेटिंग्स > कॅमेरा (Settings > Camera) मध्ये जा. तिथे 'ग्रिड' ऑन करा. हे केल्यावर लगेच तुमच्या कॅमेरा स्क्रीनवर नऊ चौकोनांची एक ग्रिड दिसेल. यामुळे फोटो फ्रेम करणे सोपे जाते.
३. शार्प फोटोंसाठी फोकस आणि एक्सपोजर लॉक करा
खेळणारं कुत्र्याचं पिल्लू किंवा पळणारं मूल — तुम्ही पटापट त्यांचे फोटो काढता. पण नंतर पाहिल्यावर प्रत्येक फोटोचा फोकस किंवा ब्राइटनेस वेगळा दिसतो. यामुळे एक चांगला क्षण खराब होतो. उत्तम फोटोंसाठी ही तिसरी ट्रिक वापरा: AE/AF लॉक फीचर. AE/AF म्हणजे ऑटो एक्सपोजर/ऑटो फोकस. अचूक कंट्रोलसाठी हे लॉक करा.
हे कसं वापरायचं? स्क्रीनवर बोट ठेवून टॅप करा आणि धरून ठेवा. फोकस आणि एक्सपोजरसाठी योग्य जागा निवडा. वरच्या बाजूला एक पिवळा 'AE/AF Lock' बॅनर दिसेल. आता तुम्ही तुमचा कॅमेरा हलवला किंवा प्रकाश बदलला, तरी आयफोन तोच फोकस आणि एक्सपोजर कायम ठेवतो. यामुळे तुमचे सगळे फोटो शार्प आणि परफेक्ट येतात.
४. प्रोफेशनल डेप्थसाठी पोर्ट्रेट मोड वापरा
तुम्हाला माणसं, पाळीव प्राणी किंवा वस्तूंचे एकदम भारी फोटो काढायचे आहेत का? पोर्ट्रेट मोडमुळे हे शक्य होते. अनेक नवीन आयफोन मॉडेल्समध्ये हे फीचर मिळते. हे फीचर कॉम्प्युटेशनल फोटोग्राफी वापरून DSLR कॅमेरा आणि खास लेन्ससारखा इफेक्ट देते. हे बॅकग्राउंडला सुंदरपणे ब्लर करते — ज्याला 'बोकेह' (bokeh) म्हणतात. यामुळे तुमचा सब्जेक्ट एकदम उठून दिसतो आणि फोटोला प्रोफेशनल डेप्थ मिळते.
५. ProRAW किंवा ४८ मेगापिक्सेलने डिटेल्स वाढवा
तुम्हाला टॉप-क्वालिटी आणि एडिट करता येतील असे फोटो हवे आहेत का? नवीन आयफोन प्रो मॉडेल्समध्ये ॲपल ProRAW आणि ४८ मेगापिक्सेलसारखे ॲडव्हान्स फॉरमॅट्स मिळतात. हे फीचर ऑन करण्यासाठी सेटिंग्स > कॅमेरा > फॉरमॅट्स (Settings > Camera > Formats) मध्ये जा. तिथे 'Apple ProRAW' ऑन करा किंवा फोटो मोड '48 MP' वर सेट करा.
या सेटिंग्स साध्या JPEG पेक्षा खूप जास्त डेटा कॅप्चर करतात. उदाहरणार्थ, ४८-मेगापिक्सेल फोटोमध्ये खूप जास्त डिटेल्स मिळतात. तुम्ही क्वालिटी न गमावता फोटो क्रॉप करू शकता. दुसरीकडे, ॲपल ProRAW स्टँडर्ड RAW फाईल आणि ॲपलच्या कॉम्प्युटेशनल फोटोग्राफीला एकत्र करते. यामुळे फोटो एडिट करताना खूप फायदा होतो. तुम्ही एडिटिंग ॲप्समध्ये व्हाईट बॅलन्स, एक्सपोजर, शॅडोज आणि हायलाईट्स अगदी अचूकपणे ॲडजस्ट करू शकता. ही सर्वात भारी ट्रिक आहे. यामुळे फोटोग्राफर्सना जास्तीत जास्त कंट्रोल मिळतो आणि साधे फोटोही एकदम जबरदस्त बनतात.

