Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा ४४५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करत आहे. १०वी पास उमेदवारांपासून पदवीधरांपर्यंत सर्वजण अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत १९ ऑगस्ट २०२५ आहे.
मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत चांगली बातमी आहे. बँक ऑफ बडोदा या नामांकित सरकारी बँकेत 445 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती विविध पदांसाठी असून ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत 19 ऑगस्ट 2025 आहे.
विशेष म्हणजे, या भरतीसाठी काही पदांवर 10वी पास उमेदवारही पात्र आहेत, त्यामुळे कमी शैक्षणिक पात्रतेचे उमेदवारसुद्धा या संधीचा लाभ घेऊ शकतात. ही एकप्रकारे बंपर भरती मानली जात आहे.
भरतीची ठळक वैशिष्ट्ये
एकूण पदसंख्या: 445
शैक्षणिक पात्रता: पदानुसार वेगवेगळी (किमान 10वी पास)
भरती प्रक्रिया: मुलाखत आणि आवश्यकतेनुसार इतर टप्पे
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 19 ऑगस्ट 2025
अर्ज पद्धत: पूर्णतः ऑनलाइन, अधिकृत वेबसाईट – bankofbaroda.in
अर्ज करण्याची प्रक्रिया
bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Careers किंवा Recruitment सेक्शनमध्ये जा.
संबंधित पदासाठीचा Notification वाचा आणि पात्रता तपासा.
ऑनलाइन फॉर्म भरून सबमिट करा आणि आवश्यक ती कागदपत्रं अपलोड करा.
अर्जाची प्रत सेव्ह करून ठेवा.
सरकारी नोकरीचं स्वप्न साकार करण्याची संधी!
बँक ऑफ बडोदासारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये नोकरी करण्याची ही एक अनमोल संधी आहे. 10वी पासपासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत सर्वांसाठी ही भरती खुली आहे. त्यामुळे इच्छुकांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.


