बनारसी साड्या केवळ साडी नसून भारताची परंपरा, वारसा आणि कारागिरीचे प्रतीक आहेत. ही साडी प्रत्येक कार्यक्रमात योग्य ठरते. क्वचितच अशी एखादी महिला असेल जिच्या वॉर्डरोबमध्ये बनारसी साडीसाठी जागा नसेल.

मुंबई : बनारसी साडी ही वाराणसीची ओळख आहे. हिचे परंपरीक लूक आणि सौंदर्य महिलांवर शोभून दिसते. या साडीच्या माध्यमातून एक वेगळेच आकर्षण त्यांच्यात दिसून येते. साडीवरील बारीक डिझाइन, रेशमी कापड आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या भव्यतेमुळे ती प्रत्येक पिढीतील महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. पारंपरिक असो वा आधुनिक, प्रत्येक बनारसी साडी ही एक अद्भुत कलाकृती आहे. एक कुशल कारागीरच ती बनवू शकतो.

बनारसी साडीचा इतिहास

बनारसी साड्यांची सुरुवात मुघल काळात (१४ व्या शतकात) झाली, जेव्हा उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये रेशीम विणण्याच्या कलेचा पाया रचला गेला. मुघल सम्राट अकबरने बनारसी साड्यांना खूप प्रोत्साहन दिले, ज्यामुळे त्या देशभर प्रसिद्ध झाल्या.

१. बनारसी टसर सिल्क साडी

टसर सिल्क आणि बनारसी विणकामाचा अद्भुत संगम या साडीला खास बनवतो. टसर सिल्कचा सोनेरी रंग आणि रेशमी स्पर्श तिला लग्न, सण आणि खास प्रसंगांसाठी योग्य बनवतो. यामध्ये जरी आणि फुलांचे बारीक डिझाइन असतात.

२. बनारसी जॉर्जेट साडी

जॉर्जेट कापडापासून बनवलेली ही हलकी आणि लहरी साडी बहिणी आणि मैत्रिणींच्या कार्यक्रमांमध्ये परिधान करण्यासाठी योग्य आहे. यामध्ये कढाई, प्रिंट आणि जरीचा सुंदर मिलाफ आहे.

३. बनारसी ऑर्गेंझा साडी

बनारसी सिल्क आणि ऑर्गेंझाच्या मिश्रणापासून बनवलेली ही साडी एक शाही लूक देते. हलकी चमक आणि बारीक विणकाम तिला खास प्रसंगी जसे की रिसेप्शन, पार्टी किंवा पूजेसाठी सर्वोत्तम बनवते.

४. बनारसी कटान सिल्क साडी

शुद्ध रेशमापासून बनवलेली ही साडी पूर्णपणे हाताने विणली जाते. तिची बारीक जरी कढाई आणि क्लासिक डिझाइन तिला पारंपरिक आणि भव्य लूक देते. कटान सिल्क लग्न आणि सणांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

५. बनारसी मॉडेल सिल्क साडी

मॉडेल सिल्क हे आधुनिकता आणि परंपरेचे सुंदर मिश्रण आहे. तिचा गुळगुळीतपणा आणि हलकी चमक तिला खास बनवते. ज्या महिला कमी वजनाची पण शाही लूक असलेली साडी नेसू इच्छितात त्यांच्यासाठी ही आदर्श आहे.

६. बनारसी जूट सिल्क साडी

जूटची नैसर्गिक चमक आणि बनारसी कारागिरीचा संगम तिला अनोखी बनवतो. तिच्या बनावटीत पारंपारिक मोटिफ असतात, जे तिला क्लासिक आणि टिकाऊ पर्याय बनवतात. ती स्टेटमेंट दागिन्यांसह परिधान करा आणि शाही लूक मिळवा.

७. बनारसी चिनिया सिल्क साडी

चिनिया सिल्क तिच्या रेशमी चमक आणि मऊपणासाठी ओळखली जाते. यामध्ये सोनेरी किंवा जरीचे काम असते जे तिला लग्न किंवा सणांसाठी एकदम योग्य बनवते. ब्रोकेड ब्लाउज आणि जड दागिन्यांसह ही साडी लाजवाब दिसते.