MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Baby Name Selection Tips: बाळासाठी नाव निवडताना नवीन पालकांनी 'या' 5 चुका टाळा

Baby Name Selection Tips: बाळासाठी नाव निवडताना नवीन पालकांनी 'या' 5 चुका टाळा

Baby Name Selection Tips: बाळाचे नाव ही त्याची पहिली ओळख असते. जे नाव तुम्ही आज प्रेमाने निवडाल, तेच उद्या त्याच्या आत्मविश्वासाचे कारण बनेल. त्यामुळे बाळाचे नाव निवडताना कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घ्या.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Feb 04 2026, 07:42 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
बाळाचं नाव कसं निवडावं?
Image Credit : gemini ai

बाळाचं नाव कसं निवडावं?

बाळाच्या आगमनाचा आनंद जितका मोठा असतो, तितकाच गोंधळ त्याच्या नावावरून होतो. नाव असं असावं जे मनापासून आवडेल, बोलायला गोड वाटेल, पुढे मुलाला शोभेल आणि आयुष्यभर त्याच्यासोबत राहील. तुम्हीही बाळासाठी योग्य नावाच्या शोधात असाल, तर या 5 युक्त्या तुमच्या खूप कामी येतील.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
नाव छोटे पण अर्थ दमदार असावा
Image Credit : INSTAGRAM

नाव छोटे पण अर्थ दमदार असावा

आजकाल छोटी नावं जास्त ट्रेंडमध्ये आहेत. लांब आणि जड नावं शाळा, कागदपत्रं आणि दैनंदिन जीवनात अडचणीची ठरतात. नेहमी २-३ अक्षरी नाव निवडा. असं नाव जे ऐकताच लक्षात राहील आणि त्याचा अर्थ सकारात्मक व प्रभावी असेल. जसं की - शक्ती, प्रकाश, खुशी, आरव, सिया.

Related Articles

Related image1
Parenting Tips : मुलं खोटं बोलतायत हे कसे ओळखावे? पालकांनी जाणून घ्या या महत्त्वाच्या टिप्स
Related image2
Parenting Tips : मुलांना न ओरडता अशा 5 पद्धतीने शिकवा त्यांच्या जबाबदाऱ्या, नातंही राहील घट्ट
37
आजचं बाळ उद्या प्रौढही होणार आहे
Image Credit : Asianet News

आजचं बाळ उद्या प्रौढही होणार आहे

अनेक नावं लहानपणी गोंडस वाटतात, पण मोठे झाल्यावर तीच नावं विचित्र किंवा अपरिपक्व वाटू शकतात. स्वतःला विचारा की हे नाव ऑफिसमध्ये प्रोफेशनल वाटेल का? गंभीर परिस्थितीत या नावाने हाक मारता येईल का? नाव असं असावं जे लहानपणापासून म्हातारपणापर्यंत शोभेल.

47
नावाचा उच्चार सोपा ठेवा
Image Credit : Asianet News

नावाचा उच्चार सोपा ठेवा

जर नाव वारंवार चुकीचं उच्चारलं गेलं, तर मुलाला स्वतःलाच त्रास होतो. एक स्मार्ट टीप म्हणजे नाव बोलून बघा. घरातील वडीलधाऱ्यांकडून बोलून घ्या. तसेच, शाळेतील शिक्षक किंवा डॉक्टर कसे उच्चारतील याचा विचार करा.

57
ट्रेंडनुसार नाही, मनापासून नाव निवडा
Image Credit : GEMINI AI

ट्रेंडनुसार नाही, मनापासून नाव निवडा

चित्रपट, मालिका किंवा सोशल मीडियावरून प्रेरित नावं आज लोकप्रिय वाटतात, पण उद्या ती जुनी होऊ शकतात. संस्कृत, हिंदी किंवा प्रादेशिक भाषेतून नाव शोधणं उत्तम. नावामागे एखादी भावना किंवा कथा असावी आणि ते कुटुंबाच्या मूल्यांशी जोडलेलं असावं. मनापासून निवडलेलं नाव नेहमीच खास असतं.

67
आडनावासोबत नाव मोठ्याने बोलून पाहा
Image Credit : gemini

आडनावासोबत नाव मोठ्याने बोलून पाहा

नुसत नाव चांगलं असून पुरेसं ठरत नाही, ते आडनावासोबतही जुळलं पाहिजे. पूर्ण नाव मोठ्याने बोला आणि शाळेच्या प्रवेश अर्जाप्रमाणे वाचून पाहा. सोशल मीडिया प्रोफाइलचाही विचार करा. जर नाव घेताना कुठे अडखळत नसेल, तर ते योग्य आहे.

77
नवीन पालकांसाठी गोल्डन सल्ला
Image Credit : instagram

नवीन पालकांसाठी गोल्डन सल्ला

  • नाव निश्चित करण्यापूर्वी त्याचा अर्थ नक्की तपासा 
  • कोणत्याही नकारात्मक किंवा दुहेरी अर्थापासून दूर राहा 
  • खूप जास्त युनिक बनण्याचा प्रयत्न करू नका

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Northeast Trip: गर्दी नको, फक्त शांतता हवीये? मग उन्हाळ्याच्या सुट्टीत या 5 ठिकाणी नक्की जा
Recommended image2
Mannequin Planters: Gen Z ला पडली भुरळ, घराला 'Insta Worthy' लुक देणारे मॅनिकिन प्लांटर्स!
Recommended image3
Fancy Juttis: बकरीदसाठी खास स्टायलिश जोडे, प्रत्येक ड्रेसवर दिसतील एकदम परफेक्ट!
Recommended image4
Lipstick Shades: लाल-गुलाबी नाही, आता 'हे' 7 नवीन लिपस्टिक शेड्स आहेत ट्रेंडमध्ये; मिळवा आकर्षक लूक
Recommended image5
Silver Rings: ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी खास सिल्व्हर रिंग्स, पाहा किंमत आणि डिझाइन्स
Related Stories
Recommended image1
Parenting Tips : मुलं खोटं बोलतायत हे कसे ओळखावे? पालकांनी जाणून घ्या या महत्त्वाच्या टिप्स
Recommended image2
Parenting Tips : मुलांना न ओरडता अशा 5 पद्धतीने शिकवा त्यांच्या जबाबदाऱ्या, नातंही राहील घट्ट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved