एअरटेलने ओडिसामधील जगन्नाथ पुरी यात्रेसाठी खास नवीन प्रीपेड प्लॅन्स जाहीर केले आहेत, ज्यांची सुरुवात ३९९ रुपयांपासून होते. या अनलिमिटेड प्लॅन्समध्ये दररोजचा डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि अनलिमिटेड ५जी इंटरनेटचा समावेश आहे, ज्यामुळे डेटा संपल्यानंतरही चिंता राहणार नाही.

सध्याच्या घडीला रिचार्जच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत. त्यामुळं जीओचा पॅक मारावा की एरटेलचा हा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात पडत असतो. आता एअरटेल कंपनीने नवीन प्लॅन्स जाहीर केले आहेत. हे प्लॅन्स खासकरून ओडिसा राज्यातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इथं जगन्नाथ पुरी यात्रेला भाविक मोठ्या प्रमाणावर आले आहेत.

कोणता प्लॅन केला सुरु? 

एअरटेल कंपनीचा प्रीपेड प्लॅन हा ३९९ रुपयांपासून सुरु होतो. या कंपनीचा प्लॅन हा अनलिमिटेड पद्धतीचा कंपनीनं आणला आहे. या प्लॅन्समध्ये दररोजच्या डेटासोबत अनलिमिटेड ४जी आणि ५जी इंटरनेट तसेच अँलिमिनेटेड ४जी आणि ५जी इंटरनेट आणि अनलिमिटेड व्हाईस कॉलची सिस्टीम उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डेटा संपला तरी नाही राहणार चिंता 

या कार्डवरचा डेटा संपला तरी आता चिंता करण्याची गरज भासणार नाही. तिथून आपण व्हिडीओ आणि फोटो फाईल्स सहजपणे शेअर करू शकणार आहे. कंपनीचा ५जी नेटवर्क आपल्याला अनलिमिटेड वापरता येणार आहे. त्या कार्डवरून आपली वैयक्तिक आणि इतर काम सहजपणे करता येतील. यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्लॅन्स सहजपणे मिळून जातील.