Acidity problem : समोसा खाल्ल्यानंतर ॲसिडिटी, गॅस किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या खूपच कॉमन आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कोमट पाणी, ओवा, बडीशेप, थंड दूध यांसारखे काही सोपे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी आहेत.
Acidity problem : अनेकांना तळलेले पदार्थ खूप आवडतात. त्यातही वडा, समोसा आणि भजी यांना जास्त पसंती दिली जाते. कधी कधी कामाच्या धबडग्यात या तळलेल्या पदार्थांवरच दिवस काढावा लागतो. वडा (वडापाव) आणि भजी तर अनेकांना प्रिय असते. पण समोशांच्या बाबतीत मात्र वेगळा प्रकार ठरतो. मैद्याचा वापर केल्याने तो पचनास थोड जडच असतो. त्याचबरोबर ते खाल्ल्यानंतर पोटाला काहीशी फुगोशी धरल्यासारखे होते. शिवाय, छातीत जळजळही होते.
समोसा हा अनेक नागरिकांचा सर्वात आवडता नाश्ता आहे, परंतु तो खाल्ल्यानंतर ॲसिडिटी, छातीत जळजळ, गॅस आणि पोट जड होण्याची समस्या खूप सामान्य आहे. मैदा, बटाटा, मसाले आणि तेलात तळलेले असल्यामुळे समोसा पचायला जड असतो. विशेषतः रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात समोसे खाल्ल्यास पोटात ॲसिडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवते. तुम्हालाही समोसा खाल्ल्यानंतर वारंवार ॲसिडिटी होत असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. काही सोपे घरगुती उपाय आणि योग्य सवयी या समस्येपासून सुटका देऊ शकतात.
कोमट पाणी
सर्वात आधी कोमट पाणी प्या. समोसा खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोटात जमा झालेले तेल निघून जाण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे ॲसिडचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागतो.
ओवा आणि काळं मीठ
ओवा आणि काळं मीठ ॲसिडिटीच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर काळं मीठ एकत्र करून चघळल्यास गॅस आणि छातीत होणाऱ्या जळजळीपासून त्वरित आराम मिळतो. ओवा पाचक एन्झाईम्स सक्रिय करतो.
बडीशेपचे पाणी
बडीशेप किंवा बडीशेपचे पाणी देखील खूप प्रभावी आहे. समोसा खाल्ल्यानंतर १ चमचा बडीशेप चघळा किंवा पाण्यात उकळून ते पाणी प्या. यामुळे पोटात थंडावा मिळतो आणि ॲसिडचे संतुलन राखण्यास मदत होते.
थंड दूध
थंड दूध देखील ॲसिडिटी कमी करण्यास मदत करते. दूध पोटातील जळजळ कमी करते आणि ॲसिडला न्यूट्रल करते. पण लक्षात ठेवा की, दूध कोमट किंवा खूप जास्त थंड नसावे.
केळे किंवा दही
केळे किंवा दही खाल्ल्यानेही आराम मिळतो. केळे नैसर्गिक अँटासिडप्रमाणे काम करते, तर दही पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवून पचनक्रिया सुधारते.
यापुढे समोसा खाताना ही काळजी घ्या
- खूप तिखट चटणी खाऊ नका
- रिकाम्या पोटी समोसा खाऊ नका
- समोशांसोबत पाणी किंवा कोल्ड्रिंक्स पिणे टाळा.
- हळूहळू आणि मर्यादित प्रमाणात समोसे खाल्ल्यास ॲसिडिटीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते.


