- Home
- Utility News
- या इलेक्ट्रिक कारची झाली दमदार विक्री, ५० हजार लोकांनी खरेदी केलेल्या गाडीत काय आहे खास?
या इलेक्ट्रिक कारची झाली दमदार विक्री, ५० हजार लोकांनी खरेदी केलेल्या गाडीत काय आहे खास?
एमजी मोटर्सची विंडसर इलेक्ट्रिक गाडी सप्टेंबर २०२४ मध्ये लॉन्च झाली आणि एका वर्षात ५०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा गाठला आहे. या गाडीत ३८ kWh बॅटरी, ३३२ किमी रेंज, आणि ६ एअरबॅग्स सारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

या इलेक्ट्रिक कारची झाली दमदार विक्री, ५० हजार लोकांनी खरेदी केलेल्या गाडीत काय आहे खास?
एमजी मोटर्स इलेक्ट्रिक गाड्यांच्या मार्केटमध्ये आलं आहे. या कंपनीच्या विंडसर या गाडीने विक्रीचे दिवसेंदिवस नवीन विक्रम पादाक्रांत केले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये लॉन्च झालेल्या या क्रॉसओवर युटिलिटी व्हेइकलने अवघ्या एका वर्षात 50,000 युनिट्स विक्रीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
कारमध्ये काय आहे खास?
कारचा पुढील भाग आकर्षक बनवल्यामुळं बसणाऱ्या व्यक्तीला एक प्रीमियम फील येतो. स्प्लिट लाइटिंग डिझाइन, एलईडी डेलाइट रनिंग लाइट्स, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि एमजीचा चमकदार लोगो या गाडीची खास ओळख बनते.
गाडीत किती आहे पॉवर?
या गाडीमध्ये 38 किलोवॅट-तास (kWh) बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी, पॉवर आणि चार्जिंग विंडसर ईव्ही सर्व व्हेरियंट्समध्ये हि गाडी बनवण्यात आली आहे. ही पॉवरट्रेन 134 BHP पीक पॉवर आणि 200 Nm चा कमाल टॉर्क निर्माण करते.
विंडसर गाडीची किती रेंज आहे?
या गाडीची रेंज 332 किलोमीटरपर्यंत (एआरएआय प्रमाणित) धावू शकते. 50 किलोवॅट डीसी फास्ट चार्जरने ही कार फक्त 35 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.
गाडीत ६ एअरबॅग्स
या गाडीमध्ये ६ एअरबॅग्स देण्यात आले असून ईबीडी ब्रेक असिस्ट सह, हिल होल्ड कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमेरा स्टँडर्ड आहेत. गाडीमध्ये चांगली लक्झरी देण्यात आली.
गाडीची किती आहे किंमत?
या गाडीची सुरुवातीची किंमत ९.९९ लाख रुपयांपासून सुरु होते. . इतर व्हेरियंट्सची किंमत 13.50 लाख रुपयांपासून सुरू होते. या गाडीला प्रति किलोमीटर ३.५ रुपयांचा चार्ज लागत असल्याचं अभ्यास सांगतो.

