Financial Tips : तुम्हाला माहितेय का, काही आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड देणे अनिवार्य असते. अन्यथा तुम्हाला मोठा भुर्दंड भरावा लागू शकतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

Financial Tips : पॅन कार्डचा वापर केवळ इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी गरजेचा नसतो. तर बँकेत खाते सुरू करणे, म्युचअल फंड्समध्ये गुंतवणूक, प्रॉपर्टी खरेदी करणे किंवा अन्य मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डची आवश्यकता असते. जर तुम्ही पॅन कार्ड दिले नाही किंवा चुकीचा पॅन कार्ड क्रमांक दिल्यास आर्थिक व्यवहारासाठी अधिक वेळ लागू शकतो. काही प्रकरणात आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकत नाहीत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कोणत्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड द्यावे लागते? 

इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार काही आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड सादर करणे आवश्यक असते. जेणेकरुन करदात्याचे इन्कम आणि टॅक्स प्रोफाइल लिंक करुन पाहणे सोपे होते.

-20 लाखांहून अधिक किंमतीच्या प्रॉपर्टी खरेदीविक्रीसाठी पॅन कार्ड देणे आवश्यक असते. 

-2 लाखांहून अधिक किंमतीचे सामान किंवा सेवांच्या खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. 

-1 लाख रुपयांपेक्षा अधिक मुल्याचे अनलिस्टेड शेअरच्या खरेदीविक्रीसाठी पॅन कार्ड द्यावे लागते. 

-5 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या कार किंवा बाइकसाठी पॅन कार्ड द्यावे. 

-डीमॅट खाते सुरू करण्यासाठी आणि काही खास प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड मागितले जाते.

पॅन कार्ड न दिल्यास नोटीस येऊ शकते? 

ज्या ट्रांजेक्शनमध्ये पॅन कार्डची आवश्यकता असते तेथे तुम्हाला ते सादर करावे लागते. अन्यथा आर्थिक व्यवहार पुढे जात नाही. याशिवाय एकदा तुम्ही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड दिल्यास त्याचा रेकॉर्ड टॅक्स विभागाकडे होतो. ही माहिती टीडीएस (TDS), स्टेटमेंट ऑफ फाइनान्शियल ट्रांजेक्शन (SFT) आणि अॅन्युअल इन्फॉर्मेशन सेस्टमेंट (AIS) सारख्या गोष्टींमध्ये दिसते. जर तुम्ही आयटीआरमध्ये दाखवलेले उत्पन्न आणि आर्थिक व्यवहारामध्ये मोठे अंतर असल्यास तुम्हाला इन्कम टॅक्सकडून याबद्दल विचारले जाऊ शकते. याशिवाय पैसे नेमके कोणत्या मार्गाने आले याबद्दलची माहिती मागितली जाऊ शकते.

चुकीचा पॅन क्रमांक दिल्यास… 

एखाद्या व्यक्तीने चुकीचा पॅन कार्ड क्रमांक किंवा बनावट पॅन कार्ड दिल्यास त्याला 10 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. ऐवढेच नव्हे चुकीच्या पॅन कार्डमुळे टॅक्स क्रेडिट मिळण्यास समस्या येऊ शकते. टॅक्स विभागाच्या अतिरिक्त तपासालाही सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.

टॅक्स विभागाकडून असा केला जातो पॅनचा वापर? 

पॅन कार्ड संपूर्ण टॅक्स प्रणालीमध्ये व्यक्तीगत ओखळीसाठी फार महत्वाचे असते. बँक डिपॉझिट, प्रॉपर्टीचे व्यवहार, म्युचअल फंड्समध्ये गुंतवणूक आणि अन्य रिपोर्टमध्ये होणारे व्यवहार याची माहिती पॅनशी जोडली जाते. ही माहिती फॉर्म 29AS आणि AIS सारख्या प्रणालीमध्ये दिसते. यानंतर टॅक्स विभाग डेटा अॅनालिटिक्स आणि रिस्क असेसमेंट टूल्सची मदत घेत तुम्ही दिलेल्या माहितीची तुलना आयटीआरमध्ये सांगण्यात आलेल्या उत्पन्नाशी केली जाते. यामध्ये जर फार मोठा फरक आढळून आल्यास चौकशी केली जाऊ शकते. याशिवाय नोटीसही धाडली जाऊ शकते.