MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Property Documents : घर घेताय? पट्टा, चिट्टा, कागदपत्र फक्त पाहू नका.. या 10 गोष्टी नक्की तपासा

Property Documents : घर घेताय? पट्टा, चिट्टा, कागदपत्र फक्त पाहू नका.. या 10 गोष्टी नक्की तपासा

Property Documents : घर खरेदी करताना खरेदीखत, मूळ कागदपत्रे (मदर डीड), ईसी (Encumbrance Certificate), बांधकाम परवानगी, थकीत कर आणि कोर्ट केसेस यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी कशा तपासायच्या?

4 Min read
Author : Karishma R
Published : Oct 01 2026, 10:44 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
111
घर घेण्याचा विचार करताय?
Image Credit : Pinterest

घर घेण्याचा विचार करताय?

घर किंवा प्लॉट खरेदी करताना, विकणाऱ्याने दाखवलेल्या कागदपत्रांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. त्या मालमत्तेची नोंदणी कागदपत्रे, जुने मालकी हक्क, ईसी (Encumbrance Certificate), जमिनीची मोजणी आणि हद्दी, बांधकाम परवानगी, थकीत कर आणि कोर्ट केसेस या सर्व गोष्टी व्यवस्थित तपासूनच पुढचा निर्णय घ्या.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
211
मूळ कागदपत्रे (मदर डीड)
Image Credit : Pinterest

मूळ कागदपत्रे (मदर डीड)

सध्याच्या मालकाकडे या मालमत्तेचा हक्क कसा आला, हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.

उदाहरणार्थ,

  • खरेदीखत (Sale Deed)
  • वाटणीपत्र
  • सेटल्मेंट डीड (Settlement Deed)
  • बक्षीसपत्र
  • हक्कसोड पत्र
  • वारसा हक्क प्रमाणपत्र
  • कोर्टाचा आदेश (Court Order)

या कागदपत्रांची साखळी तपासल्यास मालमत्तेचा इतिहास आणि मालकी हक्क स्पष्ट होतो.

Related Articles

Related image1
Rent vs EMI : भाड्याच्या घरात राहणं योग्य की EMI वर घर घेणं? काय आहे बेस्ट ऑप्शन?
311
सध्याचे मालकी हक्क प्रमाणपत्र
Image Credit : Pinterest

सध्याचे मालकी हक्क प्रमाणपत्र

मालमत्ता विकणारी व्यक्ती खरोखरच त्या जागेची कायदेशीर मालक आहे का, याची आधी खात्री करा.

त्यासाठी कागदपत्रांवरील,

  • मालकाचे नाव
  • सर्व्हे नंबर
  • सब-डिव्हिजन नंबर
  • प्लॉट नंबर
  • जमिनीचे क्षेत्रफळ
  • चारही बाजूंच्या हद्दी
  • मालमत्तेचा पत्ता

या सर्व गोष्टी पट्टा, चिट्टा, FMB (Field Measurement Book) नकाशा आणि प्रत्यक्ष जमिनीच्या मोजणीसोबत तपासून पाहा. एका कागदपत्रात २४०० चौरस फूट आणि दुसऱ्यात २२०० चौरस फूट अशी तफावत असेल, तर कारण शोधल्याशिवाय टोकन किंवा पूर्ण रक्कम देऊ नका.

411
ईसी (Encumbrance Certificate)
Image Credit : Pinterest

ईसी (Encumbrance Certificate)

घर किंवा प्लॉट घेताना ईसी (Encumbrance Certificate) हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यातून ठराविक काळात त्या मालमत्तेवर झालेले व्यवहार आणि कर्जाचा बोजा याची माहिती मिळते.

ती मालमत्ता आधी कुणाला विकली आहे का? त्यावर कर्ज आहे का? हे ईसीवरून समजते. तामिळनाडू नोंदणी विभागाच्या माध्यमातून तुम्ही ईसीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

पण, ईसीमध्ये कोणतीही नोंद नाही म्हणजे मालमत्ता १०० टक्के निर्धोक आहे, असे समजू नका. काही नोंद न झालेले दावे किंवा कोर्ट केसेस ईसीमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे ईसीसोबतच कायदेशीर सल्लागाराकडून टायटल सर्च करून घेणे गरजेचे आहे.

511
पट्टा, चिट्टा आणि अडंगल तपासा
Image Credit : Pinterest

पट्टा, चिट्टा आणि अडंगल तपासा

मालमत्ता खरेदी करताना पट्टा, चिट्टा आणि अडंगल या महसूल नोंदी काळजीपूर्वक तपासा. यातून जमिनीचा मालकी हक्क आणि महसुली माहिती समजते.

पट्टा: महसूल रेकॉर्डनुसार जमिनीचा मालक कोण आहे, हे यातून समजते.

चिट्टा: जमिनीचा प्रकार आणि क्षेत्रफळ याची माहिती देते.

अडंगल: जमिनीचा वापर कसा होत आहे, याची नोंद यात असते.

या कागदपत्रांमधील मालकाचे नाव, सर्व्हे नंबर, सब-डिव्हिजन नंबर, क्षेत्रफळ आणि जमिनीचा प्रकार खरेदीखतातील माहितीशी जुळतोय का, हे तपासा. काही तफावत आढळल्यास आधी शहानिशा करा आणि मगच व्यवहार पुढे न्या.

611
जमिनीचे खरे क्षेत्रफळ आणि हद्दी तपासा
Image Credit : Pinterest

जमिनीचे खरे क्षेत्रफळ आणि हद्दी तपासा

प्लॉट किंवा जमीन घेताना फक्त कागदावर लिहिलेल्या क्षेत्रफळावर (Area) विसंबून राहू नका. प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमाप आणि हद्दी तपासा.

यासाठी तुम्ही,

  • FMB स्केच (Field Measurement Book)
  • TSLR (Town Survey Land Register)
  • टाऊन सर्व्हे मॅप
  • सर्व्हे नंबर आणि सब-डिव्हिजन नंबर

या गोष्टी तपासू शकता. कागदपत्रांवर असलेल्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हद्दी प्रत्यक्ष जागेवर जुळत आहेत का, हे पाहा. तामिळनाडूमध्ये बांधकाम परवानगीसाठी FMB आणि TSLR सारखी कागदपत्रे वापरली जातात.

कागदपत्रे आणि प्रत्यक्ष जागेत फरक असेल, तर व्यवहार थांबवा. गरज पडल्यास परवानाधारक सर्व्हेअरकडून (Licensed Surveyor) जमीन मोजून घ्या.

711
लेआउटला अधिकृत मंजुरी आहे का?
Image Credit : Pinterest

लेआउटला अधिकृत मंजुरी आहे का?

तुम्ही घेत असलेला प्लॉट एखाद्या लेआउटमध्ये असेल, तर त्या लेआउटला अधिकृत मंजुरी (Approved) मिळाली आहे का, हे आधी तपासा.

जागेच्या ठिकाणानुसार,

  • CMDA (Chennai Metropolitan Development Authority)
  • DTCP (Directorate of Town and Country Planning)

किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने ही परवानगी दिलेली असू शकते. ब्रोकरने 'अपुर्व्हड लेआउट' सांगितले म्हणून विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष मंजुरी क्रमांक आणि कागदपत्रे स्वतः तपासा.

811
घराची बांधकाम परवानगी
Image Credit : Pinterest

घराची बांधकाम परवानगी

तुम्ही आधीच बांधलेले घर विकत घेत असाल, तर त्या घराला बांधकाम परवानगी (Approved Building Plan) आहे का, हे नक्की तपासा. योग्य प्लॅन आणि बिल्डिंग परमिशन असल्याची खात्री करा.

मंजूर झालेल्या प्लॅननुसारच घर बांधले आहे का? परवानगी नसताना एखादा जास्तीचा मजला किंवा खोली बांधली आहे का? या गोष्टी तपासून पाहणे खूप महत्त्वाचे आहे.

911
मालमत्ता कर आणि इतर थकबाकी तपासा
Image Credit : Pinterest

मालमत्ता कर आणि इतर थकबाकी तपासा

घर घेण्यापूर्वी मालमत्ता कर (Property Tax), पाणी बिल, ड्रेनेज टॅक्स, वीज बिल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणतीही थकबाकी नाही ना, याची खात्री करा.

'घर घेतल्यावर बघू' असा विचार करू नका. जुन्या मालकाकडून टॅक्स आणि बिलांच्या पावत्या घ्या. संबंधित विभागांमध्ये जाऊन कोणतीही रक्कम थकीत नसल्याचे कन्फर्म करा.

1011
कोर्ट केसेस आणि कायदेशीर वाद
Image Credit : Pinterest

कोर्ट केसेस आणि कायदेशीर वाद

मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी त्यावर कोणताही कौटुंबिक वाद, वारसा हक्काचा प्रश्न, तिसऱ्या व्यक्तीचा दावा, कोर्ट केस किंवा कर्जाचा बोजा नाही ना, हे कायदेशीररीत्या तपासा.

फक्त ईसी (EC) क्लिअर आहे म्हणून मालमत्तेवर कोणताही वाद नाही, असा निष्कर्ष काढू नका. मालमत्तेच्या कागदपत्रांची एखाद्या अनुभवी वकिलाकडून पडताळणी (Title Search) करून घेणे आणि योग्य कायदेशीर सल्ला घेणे कधीही सुरक्षित असते.

1111
विकणाऱ्याची ओळख आणि अधिकार तपासा
Image Credit : Pinterest

विकणाऱ्याची ओळख आणि अधिकार तपासा

सर्वात शेवटी, जी व्यक्ती तुम्हाला मालमत्ता विकत आहे, तिला ती विकण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? हे तपासा.

विकणाऱ्याचे नाव, ओळखपत्र, खरेदीखतावरील नाव आणि पट्टा या सर्व गोष्टी एकमेकांशी जुळवून पाहा. मालमत्ता संयुक्त मालकीची (Joint Property) असेल, तर सर्व मालकांची संमती आहे का, हे तपासा.

जर कोणी कुलमुखत्यारपत्राद्वारे (Power of Attorney - POA) मालमत्ता विकत असेल, तर ते POA वैध आहे का आणि त्यात मालमत्ता विकण्याचा अधिकार दिला आहे का, हे वकिलाकडून तपासून घ्या.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Central Railway Ticket Rules : सेंट्रल रेल्वेने तिकीट चेकिंगचे नियम बदलले, ऑक्टोबरपासून काय बदल?
Recommended image2
Honda QC3 Electric Scooter : सिंगल चार्जवर 145 किमी रेंज, होंडाची नवीन ई-स्कूटर लाँच
Recommended image3
Green Peas Health Benefits: हिरवे वाटाणे खाण्याचे हे भन्नाट फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
Recommended image4
Price Vs Cost : 'प्राईस' आणि 'कॉस्ट' दोन्हीचा अर्थ किंमतच, पण फरक माहितीये का?
Recommended image5
UPI Transaction Fees: युपीआय व्यवहारांवर शुल्क लागल्याने फटका? व्यवहारांमध्ये घट
Related Stories
Recommended image1
Rent vs EMI : भाड्याच्या घरात राहणं योग्य की EMI वर घर घेणं? काय आहे बेस्ट ऑप्शन?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved