MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Rent vs EMI : भाड्याच्या घरात राहणं योग्य की EMI वर घर घेणं? काय आहे बेस्ट ऑप्शन?

Rent vs EMI : भाड्याच्या घरात राहणं योग्य की EMI वर घर घेणं? काय आहे बेस्ट ऑप्शन?

Rent vs EMI: भाड्याच्या घरात राहावं की EMI भरून स्वतःचं घर घ्यावं? दरमहा ₹25,000 खर्चाचं गणित मांडून 10 आणि 20 वर्षांसाठी भाडं, गृहकर्ज, व्याज आणि इतर खर्चाचा हिशोब इथे समजून घ्या.

3 Min read
Author : Karishma R
Published : Sep 24 2026, 04:11 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
₹25,000 भाडं की ₹25,000 EMI?
Image Credit : gemini ai

₹25,000 भाडं की ₹25,000 EMI?

भाड्याच्या घरात राहायचं की कर्ज काढून स्वतःचं घर घ्यायचं, हा अनेक कुटुंबांसाठी एक मोठा आर्थिक निर्णय असतो. जर तुम्ही महिन्याला ₹25,000 खर्च करू शकत असाल, तर ही रक्कम भाड्यावर खर्च करणं आणि तीच रक्कम गृहकर्जाचा हप्ता (EMI) म्हणून भरणं यात 10 किंवा 20 वर्षांत काय फरक पडतो? याचं एक प्रॅक्टिकल गणित आपण समजून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
₹50 लाखांच्या घरासाठी EMI किती असेल?
Image Credit : Google

₹50 लाखांच्या घरासाठी EMI किती असेल?

समजा तुम्ही ₹50 लाख किमतीचं घर विकत घेत आहात.

  • घराची किंमत: ₹50 लाख
  • डाऊन पेमेंट: ₹10 लाख
  • गृहकर्ज: ₹40 लाख
  • कर्जाचा कालावधी: 20 वर्षं
  • व्याजदर: 9% (अंदाजे)

या हिशोबानुसार ₹40 लाखांच्या कर्जासाठी तुमचा मासिक EMI साधारण ₹35,989 इतका असेल. म्हणजेच, ₹25,000 भाड्याशी तुलना केली, तर हे घर घेण्यासाठी तुम्हाला दरमहा सुमारे ₹11,000 जास्त मोजावे लागतील.

टीप : हे फक्त एक उदाहरणादाखल दिलेलं गणित आहे. प्रत्यक्ष EMI हा व्याजदर, कर्जाची रक्कम आणि कालावधीनुसार बदलू शकतो.

Related Articles

Related image1
Salary Calculation : 1 लाख रुपये पगार? पण तुमच्या बँक खात्यात नेमके किती पैसे येतात?
36
₹25,000 भाडं असेल तर 20 वर्षांत किती खर्च?
Image Credit : social media

₹25,000 भाडं असेल तर 20 वर्षांत किती खर्च?

जर तुमचं मासिक भाडं ₹25,000 असेल आणि त्यात कोणतीही वाढ झाली नाही असं गृहीत धरलं तर:

  • 1 वर्ष: ₹3 लाख
  • 10 वर्षं: ₹30 लाख
  • 20 वर्षं: ₹60 लाख

पण प्रत्यक्षात भाडं नेहमी सारखं राहत नाही. दर काही वर्षांनी घरमालक भाडं वाढवतो. उदाहरणार्थ, जर दरवर्षी सरासरी 5% ने भाडं वाढलं, तर 20 वर्षांत तुम्ही भरलेलं एकूण भाडं ₹60 लाखांपेक्षा खूप जास्त असेल. त्यामुळे, ₹25,000 × 240 महिने = ₹60 लाख, असा साधा हिशोब इथे चालत नाही.

46
₹40 लाखांच्या कर्जावर EMI मध्ये किती व्याज जातं?
Image Credit : Chatgpt

₹40 लाखांच्या कर्जावर EMI मध्ये किती व्याज जातं?

₹40 लाख कर्ज, 20 वर्षं आणि 9% व्याजदर या उदाहरणात:

  • मासिक EMI: साधारण ₹35,989
  • 20 वर्षांतील एकूण EMI: सुमारे ₹86.37 लाख

यामध्ये तुमची मूळ कर्जाची रक्कम ₹40 लाख आहे, पण तुम्ही व्याज म्हणून सुमारे ₹46.37 लाख भरता. म्हणजेच ₹40 लाखांचं कर्ज घेतल्यास, 20 वर्षांत तुम्हाला फक्त व्याज म्हणून जवळपास ₹46 लाख द्यावे लागतात. यासोबतच डाऊन पेमेंट, रजिस्ट्रेशनचा खर्च, मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स आणि इन्शुरन्स यांसारख्या खर्चाचाही विचार करणं गरजेचं आहे.

56
भाडं vs EMI: कशात काय फायदा?
Image Credit : Chatgpt

भाडं vs EMI: कशात काय फायदा?

भाड्याच्या घरात राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरुवातीला मोठी रक्कम डाऊन पेमेंट म्हणून द्यावी लागत नाही. नोकरी किंवा शहर बदलावं लागलं, तर घर बदलणं तुलनेने सोपं असतं. पण, तुम्ही भरत असलेल्या भाड्यातून घरावर तुमची मालकी तयार होत नाही. शिवाय, काळानुसार भाडं वाढण्याची शक्यता असतेच.

EMI वर घर घेताना सुरुवातीला डाऊन पेमेंट भरावं लागतं. त्यानंतर दीर्घकाळासाठी EMI भरावा लागतो आणि त्यावर व्याजही लागतं. पण दुसरीकडे, कर्ज पूर्ण फेडल्यानंतर ते घर तुमची स्वतःची मालमत्ता बनते.

मात्र, घर घेतल्यानंतर फक्त EMI हाच एकमेव खर्च नसतो. मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स, इन्शुरन्स आणि दुरुस्ती यांसारखे अतिरिक्त खर्चही असतात. त्यामुळे, भाडं की EMI हे ठरवताना फक्त महिन्याचा खर्च न पाहता, सुरुवातीची गुंतवणूक, दीर्घकालीन खर्च, राहण्याचा कालावधी आणि तुमची आर्थिक स्थिती या सगळ्याचा एकत्रित विचार करायला हवा.

66
मग फायनल काय? भाडं की EMI?
Image Credit : Asianet News

मग फायनल काय? भाडं की EMI?

या प्रश्नाचं सर्वांना लागू पडेल असं एकच उत्तर नाही. जर तुम्ही वारंवार नोकरी किंवा शहर बदलत असाल, किंवा तुम्हाला मोठं डाऊन पेमेंट आणि दीर्घकालीन कर्जाचं ओझं नको असेल, तर भाड्याने राहणं तुमच्यासाठी सोयीचं ठरू शकतं.

जर तुम्ही एकाच भागात दीर्घकाळ राहण्याचा विचार करत असाल, तुमच्याकडे डाऊन पेमेंट भरण्याची क्षमता असेल आणि EMI नियमित भरण्याइतपत स्थिर उत्पन्न असेल, तर तुम्ही EMI चा पर्याय निवडू शकता.

पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी घराची किंमत + भाडं + EMI + व्याज + मेंटेनन्स + प्रॉपर्टी टॅक्स + डाऊन पेमेंट + गुंतवणुकीचे इतर पर्याय या सगळ्याचं गणित मांडणं महत्त्वाचं आहे. फक्त ₹25,000 भाडं कमी वाटतंय म्हणून किंवा EMI भरला की घर स्वतःचं होईल, या भावनिक विचारावर निर्णय घेऊ नका.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Gold Rate Today : 18 ऑक्टोबर रोजी सोन्या-चांदीचे दर काय? तुमच्या शहरातील भाव इथे तपासा
Recommended image2
Petrol Diesel Prices : 18 ऑक्टोबरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव काय?
Recommended image3
Car Buying Guide: स्वस्तात कार घेताय? पण नंतरचा खर्च वाढू शकतो! या ८ गोष्टी नक्की तपासा
Recommended image4
iPhone Duo: ॲपलच्या नव्या आयफोनची बाजारात हवा, प्री-बुकिंगला तुफान प्रतिसाद
Recommended image5
Cruise Ship Rescue: क्रूझवरून समुद्रात उडी मारणाऱ्या महिलेची २० तासांनंतर थरारक सुटका
Related Stories
Recommended image1
Salary Calculation : 1 लाख रुपये पगार? पण तुमच्या बँक खात्यात नेमके किती पैसे येतात?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved