वेलिंग्टनमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर १५ वर्षीय भारतीय क्रिकेटर वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट फॅन्स आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी जगभरात कुठेही पोहोचतात. सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही सामने पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये गर्दी करत आहेत. खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यातील संवादातून अनेकदा असे काही क्षण पाहायला मिळतात, जे सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. वेलिंग्टनमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर असाच एक प्रसंग इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत अनेक युवा खेळाडूंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सामना संपल्यानंतर खेळाडूंनी स्टेडियममध्ये थांबलेल्या प्रेक्षकांची भेट घेतली.

भारताचा १५ वर्षीय ओपनिंग बॅट्समन ऑटोग्राफ देण्यासाठी बाउंड्री लाईनजवळ गेला. तिथे उपस्थित असलेल्या एका महिला फॅनने त्याला न्यूझीलंडच्या कडाक्याच्या थंडीबद्दल अगदी आईसारखा प्रेमाने सल्ला दिला.या महिलेने आधी या युवा क्रिकेटरसोबत आपल्या गावचं कनेक्शन जोडलं आणि मग त्याला एक खास सल्ला दिला.

पॉवरप्लेमध्ये ११८/० चा रेकॉर्ड आणि १९९ धावांचं टार्गेट

"वैभव... हॅलो वैभव.. आम्ही पण बलियाचेच आहोत. इथं खूप थंडी आहे, त्यामुळे थंड पाणी पिऊ नकोस, फक्त गरम पाणीच पी," असं ती फॅन म्हणाली.

Scroll to load tweet…

बलियाचं नाव ऐकताच वैभव सूर्यवंशीच्या चेहऱ्यावर हसू उमललं. "हो, ठीक आहे," असं उत्तर त्याने त्या महिलेला दिलं.या छोट्याशा संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. युजर्स या गोड व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

वेलिंग्टनच्या विजयात अभिषेक शर्माच्या ११३ धावा

हा व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वी वैभव सूर्यवंशीने मैदानात दमदार कामगिरी केली. दुसऱ्या टी-२० सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर तो फ्लॉप ठरला होता, पण या सामन्यात त्याला ओपनिंगची संधी मिळाली. या १५ वर्षीय खेळाडूने संधीचं सोनं करत अवघ्या १९ चेंडूत ४५ धावा ठोकल्या. त्याच्या या आक्रमक खेळीत ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्याने पळून फक्त ५ धावा काढल्या.

त्याने अभिषेक शर्मासोबत मिळून पहिल्या ५ षटकांतच १०० धावांची पार्टनरशिप केली. या स्फोटक सुरुवातीमुळे भारताने पॉवरप्लेच्या अखेरीस ११८/० असा स्कोर उभा केला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील हा पॉवरप्लेमधला सर्वात मोठा स्कोर आहे.भारताने १९९ धावांचं टार्गेट १३.२ षटकांत ४ विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. अभिषेक शर्माने ११३ धावांची तुफानी खेळी केली आणि त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला.