MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Sports
  • Cricket
  • Kapil Dev Vs Sunil Gavaskar : कपिल देव - सुनील गावसकर यांच्यातील 25 वर्षांचा वाद; नेमकं काय घडलं होतं?

Kapil Dev Vs Sunil Gavaskar : कपिल देव - सुनील गावसकर यांच्यातील 25 वर्षांचा वाद; नेमकं काय घडलं होतं?

भारतीय क्रिकेटचे दिग्गज कपिल देव आणि सुनील गावसकर यांच्यात तब्बल २५ वर्षे चाललेलं 'कोल्ड वॉर' आजही क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय आहे. १९८३ च्या वर्ल्ड कपपासून सुरू झालेला हा वाद कसा संपला?

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 27 2026, 05:17 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा वाद
Image Credit : chatgpt

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा वाद

अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील 'कोल्ड वॉर' सर्वांनाच माहिती आहे. तिथे थेट युद्ध झालं नाही, पण वर्चस्वाची लढाई नक्कीच होती. अगदी असंच कोल्ड वॉर भारतीय क्रिकेटमध्येही पाहायला मिळालं. भारतीय क्रिकेटवर राज्य करणारे दोन महान खेळाडू म्हणजे कपिल देव आणि सुनील गावसकर.

या दोघांमध्ये तब्बल २५ वर्षे शीतयुद्ध चाललं. त्यांनी एकमेकांना कधीच शिवीगाळ केली नाही. पण संधी मिळताच त्यांनी एकमेकांना टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला. बरोबर २५ वर्षे हा वाद सुरू होता. पण प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो, तसाच या दोघांमधला वादही २५ वर्षांनंतर संपला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
१९८३ च्या वर्ल्ड कपपासून वादाला सुरुवात
Image Credit : x/Om Prakash Bakoria

१९८३ च्या वर्ल्ड कपपासून वादाला सुरुवात

या वादाची खरी सुरुवात १९८३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये झाली. त्या स्पर्धेत कपिल देव भारतीय टीमचे कॅप्टन होते. सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. त्याचवेळी दिग्गज बॅट्समन सुनील गावसकर यांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. त्या वर्ल्ड कपमध्ये सहा इनिंग्स खेळून गावसकर यांनी फक्त ६४ रन्स केले.

देशाचा सर्वात मोठा मॅच विनर असा फ्लॉप झाल्याने टीम मॅनेजमेंट टेन्शनमध्ये होती. त्यावेळी भारताची मॅच वेस्ट इंडिजविरुद्ध होती. या महत्त्वाच्या मॅचपूर्वी टीमने एक खास मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये कॅप्टन कपिल देव यांनी गावसकरांना थेट तोंडावर सुनावलं. असं चालणार नाही, तुम्हाला रन्स करावेच लागतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. कपिल यांच्या या बोलण्यामुळे गावसकर खूप दुखावले गेले. त्यानंतर पुढच्या मॅचमधून गावसकरांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढलं. पण, सीनियर खेळाडू दिलीप वेंगसरकर जखमी झाल्याने गावसकर पुन्हा टीममध्ये आले. इथूनच दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली.

Related Articles

Related image1
Virat Kohli : 'हे फक्त मोजक्याच लोकांना जमतं'; विराटच्या ऐतिहासिक कामगिरीवर कपिल देव खूश
Related image2
Sunil Gavaskar : सुनील गावसकर यांनी सांगितला जीवनाचा 'तिसरा डाव', सोबर्सच्या त्या कॅच ड्रॉपची आठवण
35
गावसकरांचा बदला.. ईडन गार्डन्सवर मोठा राडा
Image Credit : Getty

गावसकरांचा बदला.. ईडन गार्डन्सवर मोठा राडा

टीममधून बाहेर काढल्याचा अपमान गावसकर विसरले नव्हते. बरोबर एका वर्षानंतर १९८४ मध्ये त्यांनी याचा बदला घेतला. त्यावेळी भारत आणि इंग्लंड यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर तिसरी टेस्ट मॅच होणार होती.

त्या टेस्ट सिरीजमध्ये सुनील गावसकर कॅप्टन होते. त्यांनी आपल्या कॅप्टन्सीमध्ये कपिल देव आणि संदीप पाटील यांना फायनल टीममधून डॉप केलं. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली. स्टेडियममध्ये फॅन्सनी 'नो कपिल - नो टेस्ट मॅच' असे मोठे बॅनर्स झळकावून निषेध नोंदवला. एवढा राडा होऊनही ती मॅच भारतीय टीमनेच जिंकली. पण, आपल्यावर झालेल्या टीकेवर बोलताना गावसकरांनी स्पष्ट केलं की, त्या दोघांना ड्रॉप करण्याचा निर्णय माझा नव्हता, तर तो सिलेक्टर्सचा होता.

45
२५ वर्षे एकमेकांशी न बोलणारे दिग्गज
Image Credit : Social Media

२५ वर्षे एकमेकांशी न बोलणारे दिग्गज

कपिल देव आणि सुनील गावसकर यांच्यातील वाद इतक्या टोकाला गेला होता की, दोघांनी तब्बल २५ वर्षे एकमेकांशी साधं बोलणंही टाळलं. मैदानावर समोरासमोर आले तरी ते एकमेकांकडे दुर्लक्ष करायचे.

त्यांनी एकमेकांची साधी विचारपूस करण्याची तसदीही घेतली नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दोन दिग्गजांनी इतका काळ न बोलणं हा त्यावेळी खूप मोठा चर्चेचा विषय होता. अनेकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनीही आपला हट्ट सोडला नाही. दहा, वीस वर्षे उलटून गेली तरी त्यांच्यातला बर्फ काही वितळला नाही.

55
एका पार्टीत संपली २५ वर्षांची दुश्मनी
Image Credit : Getty

एका पार्टीत संपली २५ वर्षांची दुश्मनी

अखेर या प्रदीर्घ कोल्ड वॉरवर २५ वर्षांनंतर पडदा पडला. १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला, त्याला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला वर्ल्ड कप जिंकणारी संपूर्ण टीम उपस्थित होती. त्याच कार्यक्रमाला कपिल देव आणि सुनील गावसकरही आले होते.

तिथे इतर खेळाडूंनी या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून दोघांनीही आपले जुने मतभेद आणि दुश्मनी बाजूला ठेवली. त्या पार्टीत त्यांनी एकमेकांची प्रेमाने गळाभेट घेतली आणि आपल्या प्रदीर्घ मौनाला पूर्णविराम दिला. अशा प्रकारे २५ वर्षे चाललेल्या या मोठ्या शीतयुद्धाचा शेवट झाला.

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
क्रिकेट बातम्या

Recommended Stories
Recommended image1
NZ vs IND 3rd T20I: अभिषेक आणि वैभवचा वेलिंग्टनमध्ये धमाका, सायमन डूलला चाहत्यांनी केलं ट्रोल
Recommended image2
Abhishek Sharma : षटकारांचं वादळ; अभिषेक शर्माने मोडला कोहली-रोहितचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास
Recommended image3
PV Sindhu Bengaluru Home : मॉडर्न लूक आणि ट्रॅडिशनल टच, पीव्ही सिंधूचं घर पाहिलंत का?
Recommended image4
Shubman Gill : न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुभमन गिलची तगडी तयारी, स्वतःच्या खर्चाने नेले नेट बॉलर्स
Recommended image5
Pakistan Pink Jersey : नेहमी हिरवी जर्सी घालणारी पाकिस्तानची टीम इंग्लंडविरुद्ध पिंक जर्सीत का उतरली?
Related Stories
Recommended image1
Virat Kohli : 'हे फक्त मोजक्याच लोकांना जमतं'; विराटच्या ऐतिहासिक कामगिरीवर कपिल देव खूश
Recommended image2
Sunil Gavaskar : सुनील गावसकर यांनी सांगितला जीवनाचा 'तिसरा डाव', सोबर्सच्या त्या कॅच ड्रॉपची आठवण
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved