भारताच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 1000 धावा पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्याने अवघ्या 473 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठून ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ओवेनला मागे टाकले. या कामगिरीमुळे वैभव भारतीय क्रिकेटचा नवा स्टार म्हणून उदयास येत आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 1000 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता भारताच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला आहे. अवघ्या 473 चेंडूंमध्ये 1000 धावांचा टप्पा पार करत त्याने जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या कामगिरीमुळे क्रिकेटविश्वात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
लवकर धावा केल्या पूर्ण
याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ओवेनच्या नावावर होता. त्याने 533 चेंडूंमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र वैभव सूर्यवंशीने तब्बल 60 चेंडू आधी हा टप्पा गाठत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीची आता सर्वत्र प्रशंसा होत आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू सायमंड्स आहे. सायमंड्सने 558 चेंडूंमध्ये 1000 धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर भारताचा आशुतोष शर्मा असून त्याने 570 चेंडूंमध्ये हा टप्पा पार केला होता. यावरून भारतीय खेळाडूंची दमदार उपस्थिती दिसून येते.
वैभवने कोणाला टाकले मागे?
पाचव्या स्थानावर न्यूझीलंडचा फिन अॅलन आहे. त्याने 573 चेंडूंमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. फिन अॅलन हा आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो, पण वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीने त्यालाही मागे टाकले आहे. वैभव सूर्यवंशीची ही कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. एवढ्या कमी चेंडूंमध्ये 1000 धावा करणे म्हणजे सातत्य, आत्मविश्वास आणि स्फोटक फलंदाजीचे मोठे उदाहरण आहे. आगामी काळात तो भारतीय क्रिकेटचा नवा स्टार ठरू शकतो, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.


