सार
IPL 2024 : आयपीएल 2024 च्या लखनऊ सुपर जाएंट्सचा सनराइजर्स हैदराबाद संघाविरोधातील सामन्यात पराभव झाला. अशातच लखनऊ संघाचे मालक संजीव गोयनकांनी के. एल. राहुल याच्यावर संताप व्यक्त केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
SRH vs LSG 2024 : आयपीएल 2024 मधील 57 वा सामना सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्समध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात लखनऊचा दारुण पराभव झाला. अशातच हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये खेळवण्यात आलेल्या सान्यात सनराइजर्स हैदराबादच्या संघाने 10 विकेट्सने सामना जिंकला. पण लखनऊने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 शतकात 165 धावा काढल्या. अशातच सध्या सोशल मीडियावर लखनऊ विरुद्ध सनराइजर्सचा सामना झाल्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येतेय की, लखनऊ संघाचे मालक संजीव गोयनका (Sanjiv Goenka) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) यांच्यासोबत बातचीत करत आहेत. पण गोयनका यांच्या बोलण्यावरुन ते केएल राहुल याच्यावर राग व्यक्त करतानाचे हावभाव कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत. अशातच गोयनका यांचे केएल राहुल यांच्यासोबतची वागणूक पाहता नेटकऱ्यांनी लखनऊ संघाच्या मालकांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे.
नेटकऱ्यांनी दिल्यात अशा प्रतिक्रिया
एका युजरने म्हटले की, "संजीव गोयनका यांचे केएल राहुलसोबतचे वागणे अत्यंत चुकीचे आहे. सामन्यांनंतर मालकांनी मैदानाबाहेर राहावे आणि संघाच्या योजनांमध्ये हस्तक्षेप करू नये." दुसऱ्या युजरने म्हटले की, लखनऊच्या संघाचा सामन्यात पराभव झाल्याने संघ मालकांकडून कर्णधारसोबत केले जाणारे वर्तन अत्यंत चुकीचे आणि निराशाजनक आहे. तिसऱ्या युजरने म्हटले की, आयपीएलच्या दोन्ही बाजू पैशांच्याच आहेत. लहान शहरातील अनेक क्रिकेटपटून आयपीएलमुळे क्रिकेटला करियर म्हणू शकतात. पण यामध्ये व्यवसायाची जोड असते. हे खरंतर चुकीचे आहे.
लखनऊ संघाने दिले स्पष्टीकरण
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लखनऊ संघाच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलेय की, आम्ही त्या खेळामुळे दुखावले गेलो. उप्पलच्या स्टेडिअमधील प्रत्येक निळ्या ध्वजासाठी आणि सोशल मीडियावरील आमच्या संदर्भातील प्रत्येक कमेंट आणि पोस्टसाठी कृतज्ञ आहोत.
आणखी वाचा :
Paris Olympics 2024 : भारतीय पुरुष आणि महिलांचा 4x400 मीटर रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र