Paris Olympics 2024 : भारतीय पुरुष आणि महिलांचा 4x400 मीटर रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

| Published : May 06 2024, 11:13 AM IST

Paris-Olympic-Indian-players-list

सार

भारतीय पुरुषांचा आणि महिलांचा 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. जागतिक ऍथलेटिक्स रिलेमध्ये पुरुष आणि महिला संघाने चांगल्या प्रदर्शनाने हे स्थान मिळवले आहे.

सोमवारी बहामास येथे सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स रिलेमध्ये भारतीय पुरुष आणि महिलांचे 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. महिलांच्या स्पर्धेत, रुपल चौधरी, एमआर पूवम्मा, ज्योतिका श्री दांडी आणि सुभा वेंकटेशन या चौघांनी 3 मिनिटे आणि 29.35 सेकंदांची वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले आहे. प्रथम स्थानी जमैका असून त्यांनी 3 मिनिटे 28 सेकंद मध्ये पूर्ण केले होते. यासह त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले आहे.

नंतर झालेल्या पुरुष संघाच्या सामन्यात , मुहम्मद अनस याहिया, मुहम्मद अजमल, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांच्या संघाने 3 मिनिटे आणि 3.23 सेकंदांच्या सामूहिक वेळेसह पूर्ण केले तर अमेरिकेने (2:59.95)वेळात सामना पूर्ण करत प्रथम स्थान मिळवले आहे. त्यांच्या या हीटमध्ये भारताने दुसरे स्थान मिळवले असून दुसऱ्या फेरीतील तीन हीटमधील प्रत्येकी दोन अव्वल संघ 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार होते. भारतीय महिला संघ रविवारी पहिल्या फेरीच्या पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर होता. 3 मिनिटे आणि 29.74 सेकंद सह त्यांनी तो सामना पूर्ण केला होता.

दुर्दैवाने दुस-या लेगचा धावपटू राजेश रमेश याला अचानक सामना दरम्यान क्रॅम्प आल्याने मध्यभागी माघार घेतल्याने पहिल्या फेरीत सामना पूर्ण करता आला नव्हता. यासह भारताकडे आता पॅरिसला जाणारे 19 ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट आहेत आणि या यादीत गतविजेता भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्रा यांचा समावेश आहे. पॅरिस ओलीम्पिकमध्ये ॲथलेटिक्स स्पर्धा 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.

Read more Articles on