- Home
- Sports
- Cricket
- IND vs PAK: जबरदस्त सौंदर्याने लक्ष वेधते पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची पत्नी, जाणून घ्या काय करते सामिया
IND vs PAK: जबरदस्त सौंदर्याने लक्ष वेधते पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची पत्नी, जाणून घ्या काय करते सामिया
Hassan Ali Wife Samiya: एशिया कप 2025 च्या फायनलमध्ये 28 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तान संघाची खरी ताकद त्यांचे गोलंदाज आहेत. यानिमित्ताने, जाणून घेऊया पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज हसन अलीची पत्नी सामियाबद्दल.

हसन अलीची पत्नी आहे भारतीय
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीची पत्नी सामिया आरजू ही मूळची भारतातील आहे. तिचा जन्म हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील चंदेनी गावात झाला होता.
सामिया आहे एरोनॉटिकल इंजिनिअर
सामिया आरजूने फरीदाबादच्या मानव रचना युनिव्हर्सिटीमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे. तिचे काही शिक्षण इंग्लंडमध्येही झाले आहे.
एअर होस्टेस ते फ्लाइट इंजिनिअर
सामिया आरजूने काही काळ जेट एअरवेजमध्ये एअर होस्टेस म्हणून काम केले. नंतर ती एमिरेट्स एअरलाइन्समध्ये फ्लाइट इंजिनिअर बनली.
दुबईत झाली पहिली भेट
हसन अली आणि सामिया आरजू यांची पहिली भेट दुबईत झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 2019 मध्ये दोघांनी दुबईतच लग्न केले.
हसन आणि सामिया दोन मुलींचे पालक
लग्नानंतर सामिया आरजू आणि हसन अली 6 एप्रिल 2021 रोजी पालक झाले. सामियाने तिची पहिली मुलगी हेलेनाला जन्म दिला. त्यांना हेझल नावाची आणखी एक मुलगी आहे.
सामियाचे वडील होते सरकारी अधिकारी
सामियाचे वडील हरियाणात गटविकास अधिकारी होते. तिचे कुटुंब फरीदाबादमध्येच राहते.
पतीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी
सामिया अनेकदा तिचा पती हसन अलीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आहेत, ज्यात ती हसनला चीअर करताना दिसत आहे.
विराट कोहलीची मोठी फॅन आहे सामिया
सामिया वयाने पती हसनपेक्षा 1 वर्षाने लहान आहे. हसनचा जन्म 2 जुलै 1994 रोजी झाला होता, तर सामियाचा जन्म 15 सप्टेंबर 1995 रोजी झाला. हसन अलीची पत्नी सामिया ही विराट कोहलीची मोठी फॅन आहे.

