- Home
- Sports
- Cricket
- Indian Cricket : हर्षित राणाला टीम इंडियात वारंवार संधी का मिळते? अखेर सत्य आले समोर!
Indian Cricket : हर्षित राणाला टीम इंडियात वारंवार संधी का मिळते? अखेर सत्य आले समोर!
Indian Cricket : टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला भारताच्या तिन्ही फॉरमॅटच्या संघात वारंवार स्थान मिळत आहे. यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. पण हर्षित राणाला संघात स्थान का मिळत आहे, याचे खरे कारण आता समोर आले आहे.

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी हर्षित राणाला संधी
हर्षित राणाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. मोठ्या टीकेनंतरही, त्याला भारताच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सतत संधी मिळत आहे.
गंभीरचा लाडका खेळाडू हर्षित राणा
हर्षित राणा 2024 च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या चॅम्पियन संघाचा सदस्य होता. तो गौतम गंभीरचा लाडका खेळाडू असल्याने त्याला टीम इंडियात संधी मिळत आहे, असे म्हणत नेटकरी ट्रोल करत आहेत.
2024 मध्ये टीम इंडियात पदार्पण
हर्षित राणाने नोव्हेंबर 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर, जानेवारी 2025 मध्ये त्याने भारतासाठी टी-20 मध्ये पदार्पण केले. यानंतर, त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळवायला वेळ लागला नाही.
भारतासाठी राणाची सामान्य कामगिरी
हर्षित राणाने आतापर्यंत भारतासाठी 2 कसोटी सामन्यांत 4 विकेट्स, तीन टी-20 सामन्यांत 10 च्या इकॉनॉमीने 5 विकेट्स आणि 5 एकदिवसीय सामन्यांत 10 विकेट्स घेतल्या आहेत.
सोशल मीडियावर हर्षित राणा ट्रोल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी हर्षित राणाची निवड होताच, अनेक माजी क्रिकेटपटू आणि नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
अश्विनने राणाच्या निवडीचे केले समर्थन
पण टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन आणि आकाश चोप्रा यांनी हर्षित राणाच्या निवडीचे समर्थन केले आहे.
वर्ल्ड कप डोळ्यांसमोर ठेवून राणाला संधी
येणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला डोळ्यांसमोर ठेवून, हर्षित राणाची क्षमता, फलंदाजी कौशल्य, त्याची उंची आणि वेगवान गोलंदाजी लक्षात घेऊन त्याला अधिक संधी दिली जात आहे.

