MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Sports
  • Cricket
  • IND vs PAK Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा जलवा, पाकिस्तानला लोळवून जिंकलं गोल्ड

IND vs PAK Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा जलवा, पाकिस्तानला लोळवून जिंकलं गोल्ड

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पुरुष क्रिकेट फायनलमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अटीतटीच्या या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १९ धावांनी धुव्वा उडवला आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 03 2026, 02:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
Image Credit : X/BCCI

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पुरुष क्रिकेट फायनलमध्ये भारतीय संघाने दमदार खेळ करत चॅम्पियनचा किताब पटकावला. जपानमधील निस्सिन मैदानावर ३ ऑक्टोबरला हा थरारक सामना झाला. यात टीम इंडियाने पाकिस्तानला १९ धावांनी हरवलं आणि सुवर्णपदक जिंकलं. या ऑलराऊंड कामगिरीच्या जोरावर भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माची तुफानी फटकेबाजी
Image Credit : X/BCCI

अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माची तुफानी फटकेबाजी

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ६ बाद २११ धावांचा डोंगर उभारला. युवा फलंदाज तिलक वर्माने अवघ्या २१ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने २२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा कुटल्या. अभिषेक शर्मानेही ६१ धावांची वादळी खेळी केली, ज्यात ३ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. शेवटी शिवम दुबेने १५ चेंडूत २७ धावा करत संघाला २१२ चे टार्गेट सेट करून दिले. पाकिस्तानच्या अहमद दानियालने ४३ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या.

Related Articles

Related image1
Virat Kohli Retirement : विराट कोहलीचा 2027 चा वर्ल्ड कप शेवटचा असणार, नेमकं काय म्हणाला?
Related image2
Rohit Sharma : टीकाकारांना सडेतोड उत्तर, २०२७ च्या वर्ल्ड कपवर रोहितची नजर
35
पाकिस्तानची झुंज अपयशी, हसन नवाजची एकाकी लढत
Image Credit : X/BCCI

पाकिस्तानची झुंज अपयशी, हसन नवाजची एकाकी लढत

२१२ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरने लागोपाठ विकेट्स घेत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं. पण एका बाजूने विकेट्स पडत असताना हसन नवाजने ५१ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ९६ धावांची एकाकी झुंज दिली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा केल्याने पाकिस्तानला २० षटकांत ६ बाद १९२ धावांपर्यंतच मजल मारता आली.

45
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा
Image Credit : X/BCCI

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा

भारतीय गोलंदाजांपैकी अक्षर पटेल (४-०-२९-२), वॉशिंग्टन सुंदर (४-०-२९-२) आणि शिवम दुबे (३-०-३३-२) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. स्टार पेसर जसप्रीत बुमराहला विकेट मिळाली नसली तरी त्याने ४ षटकांत फक्त ३३ धावा देत धावांना ब्रेक लावला. शेवटच्या षटकात पाकिस्तानला ३३ धावांची गरज होती. शिवम दुबेने पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, पण शेवटच्या चेंडूवर शतकवीर हसन नवाजला आऊट करत भारताचा विजय निश्चित केला.

55
पाकिस्तानविरुद्ध भारताचा सलग सातवा विजय
Image Credit : PTI

पाकिस्तानविरुद्ध भारताचा सलग सातवा विजय

या विजयासोबतच भारताने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पाकिस्तानवर सलग सातवा विजय नोंदवला आहे. महिला क्रिकेट संघाने याआधीच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, आणि आता पुरुष संघानेही गोल्ड जिंकून देशाची मान उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेट संघाचा हा दबदबा खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
क्रिकेट बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jasprit Bumrah Net Worth : आयपीएलमध्ये कोट्यवधींची कमाई, गॅरेजमध्ये मेबॅक... बुमराहची संपत्ती किती?
Recommended image2
Vinod Kambli : विनोद कांबळी आता कुठे आहे? वृद्धाश्रमातील व्हिडिओ आला समोर
Recommended image3
Shubman Gill: शुभमन गिलची घरच्या मैदानावर आणखी एका मोठ्या खेळीवर नजर
Recommended image4
Abhishek Sharma SRH: अभिषेक शर्मा सोडणार का SRH ची साथ? काव्या मारनवर भडकला स्टार बॅटर!
Recommended image5
Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत-पाकिस्तान महामुकाबला!
Related Stories
Recommended image1
Virat Kohli Retirement : विराट कोहलीचा 2027 चा वर्ल्ड कप शेवटचा असणार, नेमकं काय म्हणाला?
Recommended image2
Rohit Sharma : टीकाकारांना सडेतोड उत्तर, २०२७ च्या वर्ल्ड कपवर रोहितची नजर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved