क्रिकेटपट्टू हार्दिक पांड्या आणि मॉडेल जस्मिन वालिया यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केल्याने ब्रेकअपच्या अफवांना उधाण आले आहे. हार्दिकच्या सामन्यादरम्यान जस्मिनला त्याच्यासोबत पाहिले जात होते.

प्रसिद्ध क्रिकेटपट्टू हार्दिक पांड्यासोबत नताशा स्टॅनकोव्हिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर मॉडेल जस्मिन वालियासोबत त्याच नाव जोडलं गेलं होत. पण परत आता दोघांचा ब्रेकअप झाला असल्याची माहिती समजली आहे. हार्दिकच्या सामन्याच्या वेळी जस्मिनला आणि हार्दिकला दोघांना सोबत पाहण्यात आलं होत, पण दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं आहे. त्यामुळं त्यांच्या ब्रेकअपची चर्चा परत एकदा सुरु झाली आहे.

आधीच्या बायकोसोबत घटस्फोट झाल्यानंतर जोडलं गेलं नाव 

नताशा स्टॅनकोव्हिकसोबत घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचं नाव जस्मिन वालियासोबत जोडलं जात होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान जस्मिनला हार्दिकसोबत पाहिलं होतं. तिला मुंबई इंडियन्स संघाच्या बसमध्ये पाहिलं होतं. काही महिन्यांपासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होत पण आता अनफॉलो केल्यामुळं दोघांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

हार्दिक आणि जस्मिनने एकमेकांना केलं अनफॉलो 

हार्दिक आणि जस्मिन या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा त्यामुळं सुरु झाल्या आहेत. एका चाहत्याने रेडिटवर कमेंट करत याकडे सर्वांचं लक्ष वेधलं की दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. रेडिट युजरने लिहिलं, ‘हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालियाने एकमेकांना अनफॉलो केलं? मी नुकतंच पाहिलं की त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. काय चाललंय?’.

जस्मिन वलिया ही एक ब्रिटिश गायिका आणि मॉडेल आहे. तिचा जन्म इंग्लंडमध्ये झाला, ती भारतीय वंशाची आहे. . तिने ब्रिटिश रियालिटी टीव्ही सिरीज ‘द ओन्ली वे इज एसेक्स’ (TOWIE) मध्ये भाग घेतला होता. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. तिने 2010 मध्ये या शोमध्ये एक्स्ट्रा म्हणून सुरुवात केली होती, परंतू लवकरच तिने स्वतःची ओळख निर्माण केली आणि 2012 पर्यंत ती शोचा पूर्णपणे भाग बनली.