IND vs PAK Final, Asia Cup 2025: दुबईत होणाऱ्या भारत-पाकिस्तान फायनल सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे.
दुबई: दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित फायनल सामना रंगत आहे. भारताचे कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, संघासाठी एक मोठी धक्का देणारी बातमी म्हणजे हार्दिक पांड्या दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी रिंकू सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. तसेच, अर्शदीपसिंगऐवजी शिवम दुबेनं पुनरागमन केलं आहे.
टीम इंडियाची फायनलसाठी प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन
साहिबजादा फरहान, फखर झमान, सईम अयूब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाझ, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस राउफ, अबरार अहमद
भारत-पाक फायनलची ही रोमांचक टक्कर क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी ठरणार यात शंका नाही. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

