मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांचे अँटिलीया घर प्रसिद्ध आहे. त्यांच्या घराशेजारी अल्टामाउंट रोडवर टाटा सन्सचे एन. चंद्रशेखर, रेमंडचे गौतम सिंघानिया आणि मोतीलाल ओसवाल यांच्यासारखे अनेक दिग्गज आणि श्रीमंत लोक राहतात.
मुंबई: भारतात सर्वात श्रीमंत म्हणून मुकेश अंबानी हे कायमच चर्चेत असतात. त्यांचं अँटिलीया हे घर लक्जरीसाठी कायमच चर्चेत येत असतं. त्यांच्या शेजारी कोण राहत याबद्दल बोललं जात. त्यांच्या शेजारी अनेक दिग्गज लोक राहत असतात.

मुकेश अंबानींच्या शेजारी कोण राहत?
मुकेश अंबानींच्या शेजारी टाटा सन्सचे एन. चंद्रशेखर यांच्यापासून रेमंडचे गौतम सिंघानिया, मोतीलाल ओसवाल यांच्यासारखे अनेक श्रीमंत लोक तिथं राहतात. त्यांच्या शेजारी अल्टामाउंट रोडवर श्रीमंत लोक राहतात. या श्रीमंत लोकांमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश होतो.
लक्जरी घरांपासून मोठ्या अपार्टमेंटपर्यंत कायमच या रोडवरची घरं चर्चेत येत असतात. टाटा सन्सचे चंद्रशेखर यांचं घर या रोडवर आहे. ते जसलोक हॉस्पिटलजवळ एका डुप्लेक्स घरामध्ये राहतात. त्यांच्या जवळच फायनान्स क्षेत्रातील दिग्गज मोतीलाल ओसवाल यांचं घर आहे. त्यांनी येथे २०२० मध्ये दोन लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले होते.
गौतम सिंघानिया मुकेश अंबानींचे शेजारी
रेमंड ग्रुपचे गौतम सिंघानिया हे मुकेश अंबानी यांचे शेजारी आहेत. ते त्यांच्या लक्जरी राहणीमानासाठी खासकरून ओळखले जातात. जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीचे माजी एमडी प्रशांत जैन यांनी जवळच ४५ कोटींचं घर खरेदी केलं. हे घर त्यांच्या श्रीमंतीचं लक्षण दिसून येत असत.


