मुंबईत पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सध्याच्या महापौरांवर गंभीर आरोप केले आहेत. महापौर महत्त्वाच्या पत्रांवर सह्या करत नसल्याचा दावा पेडणेकर यांनी केला आहे.

मुंबईत पावसामुळं रोज वेगवेगळ्या घटना घडताना दिसून येत आहेत. कधी बसवर झाड कोसळून छोट्या मुलाचा मृत्यू होतो तर कधी मॅनहोलमध्ये माणूस पडून त्याचा मृत्यू होतो. त्यामुळं राज्यात नेमकं चाललंय काय हा जनतेला प्रश्न पडत आहे. आता त्याच प्रश्नाचं उत्तर महापौर आणि माजी महापौर यांच्यात वाद झाल्याचं दिसून आलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या? 

किशोरी पेडणेकर यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, मु खुलेआम महापौरांच्या दालनात जाऊन आले. मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन एक पत्र देऊन आले आहे. महापौर पत्रांवर सह्या करत नसल्याचं यावेळी आमच्या लक्षात आलं. त्यांच्या कार्यलयात जाऊन मी माहिती घेतल्याचं यावेळी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.