MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • विरार-डहाणूकरांचा प्रवास आता 'सुपरफास्ट'! पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्यांची लोकल; १७ नवीन फेऱ्यांमुळे गर्दीतून सुटका!

विरार-डहाणूकरांचा प्रवास आता 'सुपरफास्ट'! पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्यांची लोकल; १७ नवीन फेऱ्यांमुळे गर्दीतून सुटका!

Mumbai Local: पश्चिम रेल्वेने विरार-डहाणू मार्गावर १५ डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. या नवीन सेवेमुळे रेल्वेची प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार असून, १७ फेऱ्या सुरू करण्यात येणारय.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 06 2026, 06:41 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
विरार डहाणूकरांचा प्रवास आता 'सुपरफास्ट'! पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्यांची लोकल
Image Credit : our own

विरार-डहाणूकरांचा प्रवास आता 'सुपरफास्ट'! पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्यांची लोकल

मुंबई: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी, विशेषतः विरार आणि डहाणू पट्ट्यातील लोकांसाठी एक सुखद धक्का समोर आला आहे. रोजच्या प्रवासातील जीवघेणी गर्दी आता कमी होणार असून, रेल्वेने या मार्गावर १५ डब्यांची लोकल चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नुकतीच या लोकलची यशस्वी 'ट्रायल रन' पूर्ण झाली असून, लवकरच या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
१२ डब्यांचे टेंशन संपले; आता १५ डब्यांचा थाट!
Image Credit : Social media

१२ डब्यांचे टेंशन संपले; आता १५ डब्यांचा थाट!

चर्चगेट ते विरार आणि विरार ते डहाणू या मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या मार्गांवर आता रेल्वेने आपली क्षमता वाढवली आहे. चेन्नईच्या आयसीएफ (ICF) कारखान्यातून खास १५ डब्यांच्या लोकल मुंबईत दाखल झाल्या आहेत. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनानुसार, सध्याच्या १२ डब्यांच्या गाड्या आता १५ डब्यांमध्ये रूपांतरित केल्या जातील, ज्यामुळे एकाच वेळी हजारो प्रवाशांना अतिरिक्त जागा उपलब्ध होईल. 

Related Articles

Related image1
MHADA lottery Mumbai: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाची ९०० घरांसाठी नवीन लॉटरी; पाहा कुठे आणि कशी असतील घरं?
Related image2
मुंबई लोकल अपघात प्रकरणात मोठा दिलासा! दरवाजात उभं राहणं निष्काळजी नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
35
असे असेल फेऱ्यांचे गणित
Image Credit : X(Twitter)

असे असेल फेऱ्यांचे गणित

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन एकूण १७ नवीन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चर्चगेट ते विरार: १५ डब्यांच्या ९ लोकल फेऱ्या.

विरार ते डहाणू: १५ डब्यांच्या ८ लोकल फेऱ्या.

या निर्णयामुळे विशेषतः ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सुसह्य होईल. 

45
पायाभूत सुविधा सज्ज!
Image Credit : fb

पायाभूत सुविधा सज्ज!

१५ डब्यांची गाडी म्हटली की फलाटांची लांबी महत्त्वाची ठरते. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) विरार-डहाणू मार्गावरील स्थानकांच्या फलाटांची लांबी आणि रुंदी वाढवण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. रविवार, ५ एप्रिल रोजी या मार्गावर घेतलेली चाचणी यशस्वी झाल्याने आता केवळ हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा आहे. 

55
रेल्वे अधिकाऱ्यांचे मत
Image Credit : Getty

रेल्वे अधिकाऱ्यांचे मत

"विरार-डहाणू मार्गावर पहिल्यांदाच १५ डब्यांची सेवा सुरू होत आहे. यामुळे रेल्वेची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी वाढेल आणि पीक अवर्समधील गर्दीचे नियोजन करणे सोपे जाईल."

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Monsoon Update : मुंबईकरांना पावसासाठी आणखी वाट पहावी लागणार? IMD कडून हवामानाचा नवा अंदाज
Recommended image2
मुंबईवर पाणीसंकट; पालिकेनं घेतलेला निर्णय वाचून बसेल धक्का
Recommended image3
Ganpati Festival : बीएमसीकडून शाडू मातीचा पुरवठा उशिरा; गणेश मूर्तीकारांमध्ये नाराजी
Recommended image4
Dadar Best Bus Accident : दादर प्लाझा टॉकीजजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, चारहून अधिक जखमी
Recommended image5
Mumbai Weather Update : मुंबईत उकाड्यासोबत पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचा अंदाज
Related Stories
Recommended image1
MHADA lottery Mumbai: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाची ९०० घरांसाठी नवीन लॉटरी; पाहा कुठे आणि कशी असतील घरं?
Recommended image2
मुंबई लोकल अपघात प्रकरणात मोठा दिलासा! दरवाजात उभं राहणं निष्काळजी नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved