अल निनोमुळे लांबलेल्या पावसामुळे मुंबईत १० टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. पुणे शहरापाठोपाठ मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला असून, नवीन नळ जोडण्या बंद केल्या आहेत आणि पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

पावसाळा सुरु झाला तरी अजूनही पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यासोबत महाराष्ट्रातील नागरिकांचे डोळे आकाशाकड लागून राहिले आहेत. अल निनोमुळं पाऊस लांबला असून त्यामुळं पाण्यात कपात करण्यात आली आहे. पुणे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. आता मुंबईत पुण्यासारखाच निर्णय घेण्यात आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मुंबई महानारपालिका कोणत्या करणार उपाययोजना 

मुंबई महानगरपालिकेने विविध योजना हातात घेतल्या आहेत. त्या योजनेच्या अंतर्गत मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळं नागरिकांना आता पाण्याचा वापर हा जपून करावा लागणार आहे. पाण्याचा गैरवापर झाल्यास कारवाई करण्यात येईल असंही महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

यांच्यावर होणार कठोर कारवाई 

पाण्याचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा अशा सूचना दिल्या आहेत. सुरुवातीच्या काळात १० टक्के पाणीकपात केली असून भविष्यात अजून अडचण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नवीन नळांच्या जोडण्या केल्या बंद 

नवीन पाण्याच्या नळांच्या जोडण्या बंद करण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. नवीन बांधकामांसाठी आता कोणत्याही प्रकारच्या नळांच्या जोडण्या देऊ नये असं सांगण्यात आलं आहे. सर्व जलतरण तलावांना देण्यात आलेलं पाणी आता बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळं पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची खबरदारी आता नागरिकांना घ्यावी लागणार आहे.