मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलनादरम्यान ड्युटीवर असलेल्या पोलीस शिपायाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. येथूनच पुकी कॉपचा ट्रेन्ड सुरू झालाय.

मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलनादरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील शिपायाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. खरंतर, कंटेंट क्रिएटर निधी पवारने पोलीस शिपायाला त्यांची एक रील दाखवली. या रीलमधील पोलीस शिपायाचे नाव विनोद कालुखे असल्याचे सांगितले जात आहे. कालुखे यांच्या हसण्यावरुनच ‘पुकी कॉप’चा (Pookie Cop) ट्रेन्ड सुरू झाल्याचे बोलले जात आहे. 

व्हायरल रील पाहताच पोलीस शिपाई विनोद कालुखे लाजले

निधी पवारने शिवाजी पार्क येथे विनोद कालुखे यांच्याकडे जाऊन तिच्या मोबाईलवरील एक व्हायरल रील दाखवली. या रीलमध्ये स्वतः कालुखे दिसत होते. कॅमेरा त्यांच्याकडे वळताच त्यांनी ब्लश केले. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील युजर्सने कमेंट्स केल्या आहेत. येथूनच अनेकांनी त्यांना प्रेमाने 'पुकी कॉप' असे संबोधण्यास सुरुवात केली.

View post on Instagram

'गुड गर्ल, ऑफिसर' ट्रेंडमधून मिळाली लोकप्रियता

खरंतर, काही दिवसांपूर्वी कंटेंट क्रिएटर श्रेया चड्डा हिने मुंबईतील आंदोलनादरम्यान विनोद कालुखे यांच्यासोबत एक रील तयार केली होती. या रीलमध्ये लाना डेल रे यांच्या अप्रकाशित ऑडिओतील “Everybody knows that I am a good girl, officer” या ओळींचा वापर करण्यात आला होता. ही रील व्हायरल होताच युजर्सने कालुखे यांच्या साधेपणाचे आणि शांत स्वभावाचे कौतुक केले.

View post on Instagram

'पुकी कॉप' ट्रेंडमध्ये इतर क्रिएटर्सही सहभागी

श्रेया चड्डाच्या रीलनंतर अनेक कंटेंट क्रिएटर्स आणि आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांनी याच ऑडिओचा वापर केला. त्यानंतर अनेकांनी पोलिसांसोबत अशाच प्रकारच्या रील्स तयार केल्या. अशा फनी व्हिडिओंमुळे आंदोलनाच्या गंभीर वातावरणात सोशल मीडियावर वेगळाच ट्रेंड निर्माण झाला.

आंदोलनासोबत सोशल मीडियावर Gen Z ची छाप

देशभरात परीक्षा गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना सोशल मीडियावर या आंदोलनाची वेगळीच बाजू समोर आली.