मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वसई-विरारमध्ये पाण्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून, हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. पाणी वाढल्यामुळं गाड्या बुडाल्या, तर काही ठिकाणी घर पाण्याखाली गेल्याच दिसून आलं आहे. वसई विरार येथे दोन जणांचा पाण्यामुळं जीव गेला आहे. आता पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याच काम सुरु आहे. या दोन लोकांच्या नागरिकांच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर साचलं पाणी
मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. सतत पडत असणाऱ्या पावसामुळं काही ठिकाणी वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी ट्राफिक झालं. हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत.
आज शाळेला दिली सुट्टी
आज दुपारच्या सत्राला शाळेला सुट्टी देण्यात आली होती. रविवारी मुंबईत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. शहरात कुठेही पाणी साचल्यास महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क करावा असं सांगण्यात आलं आहे. प्रशासनाने पाण्याचा तातडीने निचरा करून नागरिकांना दिलासा द्यावा असं सांगण्यात आलं.


