Shivsena Vardhapan Din : आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Shivsena Vardhapan Din : शिवसेनेच्या आजच्या (19 जून) 60 व्या वर्धापन दिनानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी उद्धव ठाकरेंच्या कलानगर येथील मातोश्री बंगल्याबाहेरील रस्त्यांवर मोठे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. याशिाय शिवसैनिकांमध्ये वर्धापन दिनानिमित्त मोठा उत्साह दिसून येत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

उद्धव ठाकरेंची पोस्ट

उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांचा पाठमोरा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोला खाली "किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी" असे कॅप्शन दिले आहे. कवी कुसुमाग्रजांच्या दूर मनोऱ्यात या कवितेतील ओळी उद्धव ठाकरेंनी लिहिल्या आहेत.

View post on Instagram

उद्धव ठाकरेंच्या पक्षातील फुटीची चर्चा

गेल्या दोन दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या नावाने जोरदार चर्चा सुरू आहे. याच्या माध्यमातून उबाठामधील सहा खासदार फोडाफोडीचे राजकरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या उबाठासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. अशातच आजच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाची सभा

उबाठा गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सायन येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पक्षातील घडामोडींनंतर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देतात, बंडखोरीच्या चर्चांवर ते कशी प्रतिक्रिया व्यक्त करतात, याची उत्सुकता वाढली आहे. या सभेलाही मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वांद्र्यात बॅनरबाजी 

Scroll to load tweet…