- Home
- Mumbai
- मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोधकांसोबत सत्ताधारी आमदार खासदारांनी भेट घेऊन दिला पाठींबा
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोधकांसोबत सत्ताधारी आमदार खासदारांनी भेट घेऊन दिला पाठींबा
आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. प्रकाश सोळंके यांनी सरकारला ठाम निर्णय घेण्याचे आवाहन केले, तर विजयसिंह पंडित आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचे म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोधकांसोबत सत्ताधारी आमदार खासदारांनी भेट घेऊन दिला पाठींबा
मनोज जरांगे यांची भेट घेऊन सत्ताधारी आणि विरोधक दोनही बाजूच्या नेत्यांनी पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळं आता या आंदोलनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी दिला ठिय्या
आझाद मैदानावर मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. तिथं जाऊन अनेक सत्ताधारी आणि विरोधातील आमदार, खासदारांनी त्यांची भेट घेऊन पाठींबा दिला आहे.
आमदार प्रकाश सोळंके काय म्हणाले?
आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यांनी पुढं बोलताना सरकारने आता ठाम निर्णय घेण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. कोर्टकचेरीच्या भानगडीत न पडता डिसिजन घ्यायचा तर तो आताच घ्यायचा ही भूमिका घेण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे.
गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित काय म्हणाले?
गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी यावेळी बोलताना ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो असून आपलं म्हणणं तिथपर्यंत मांडणार असल्याचं म्हटलं आहे.
विविध नेत्यांनी घेतल्या मनोज जरांगे यांच्या भेटीगाठी
विविध पक्षाच्या नेत्यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. खा. संजय जाधव, खा. ओमराजे निंबाळकर, खा. बजरंग सोनवणे, आ. कैलास पाटील, खा. भास्कर भगरे, खा. निलेश लंके यांनी यावेळी भेटी घेतल्या आहेत.
खासदार निलेश लंके काय म्हणाले?
मुंबईत गर्दीचा विश्वविक्रम मोडला आहे. अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळालं आहे. सरकारने आता निर्णय घेतला पाहिजे. किती दिवस ताटकळत ठेवणार आहे. एक घाव दोन तुकडे केले पाहिजे. किती दिवस घोंगडे भिजत ठेवणार आहे. दुर्जनांना बुद्धी द्यावी आणि आंदोलनाला यश यावं, अशी प्रार्थना करत असल्याचं लंके यांनी यावेळी म्हटलं.