सार
महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज यांचा भाडोत्री असा उल्लेख केला.
महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज यांचा भाडोत्री असा उल्लेख केला. वापरा आणि फेकून द्या, भाजपचे हे नवे धोरण आहे. नकली सेना, नकली पुत्र म्हणत आहेत. काही दिवसांनी मोदी नकली आरएसएसही म्हणतील. आज एका वृत्तपत्रात बातमी ही आली आहे, आता भाजपला आरएसएसची गरज नाही. याचा अर्थ आता संघाला धोका आहे. सोळावं वरीस धोक्याचं तसं संघाला शंभर वरीस धोक्याचं होणार असल्याची खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांचा भाडोत्री असा उल्लेख केला. मोदी आणि शाह यांना निवांत झोप लागो या शुभेच्छा देतो. त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाकरे नावाचा माणूस घेतला भाडोत्री
उद्धव ठाकरे म्हणाले की, अनिल देसाईंचे राज्यसभेतील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि समोरच्या उमेदवाराचेही व्हिडीओ तुमच्याकडे आले असतील. मग सांगा तुम्हाला रेवण्णासारखा पाहिजे की अनिल देसाई सारखा पाहिजे? गद्दार, चारित्र्यहिन, भ्रष्टाचारी जमवून तरी त्यांना काही पुरत नाही, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याने तिकडे एक ठाकरे नावाचा हवा म्हणून एक भाड्याने घेतला आहे. दुपारी उठून सुपारी चघळत बसले असतील.