कोकिलाबेन अंबानी, मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या आई, यांना प्रकृतीच्या कारणास्तव एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंबानी कुटुंबातील सदस्यांनाही रुग्णालयात जाताना पाहिले गेले.
मुंबई - दररोज स्थानिक ते जागतिक पातळीवर अनेक रंजक घडामोडी घडतात. यातील काही थेट आपल्या जीवनावर परिणाम करतात. आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया.
पुणे - आज महाराष्ट्रात बैल पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्त शेतात राबणाऱ्या बैलांना छान सजवून त्यांची पूजा केली जाते. त्यांना नैवद्य दिला जातो. आत त्यांना काम दिले जात नाही. तर या निमित्त वाचा बैल पोळ्याचे शुभेच्छा संदेश.
मुंबई : राज्यातील नोकरदार महिलांच्या जीवनाला नवी उभारी देणारी आणि त्यांच्या लहान मुलांसाठी सुरक्षित व पोषणयुक्त वातावरण देणारी “पाळणा योजना” महाराष्ट्रात सुरू होत आहे. नोकरदार मातांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी शासन उचलणार आहे.
मुंबई - राज्यातील सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारक यांना ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधीच म्हणजे २६ ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सवाचा आनंद दुप्पट झाला आहे.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले असून वाहतूक आणि हवाई आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची स्थिती निर्माण झाली.अशातच हवामान खात्याकडून मुंबईसाठी गुरुवारी (21 ऑगस्ट) यलो अलर्ट देण्यात आला आहे.
देशात एकीकडे लोकसभेने ऑनलाइन गेमिंगवर कडक कायदा मंजूर करून मोठे पाऊल उचलले आहे, तर दुसरीकडे मुंबई सततच्या पावसामुळे झुंजत आहे. चला तर जाणून घेऊया सकाळी ८ वाजेपर्यंतच्या मोठ्या अपडेट्स.
मुंबई पूर व्हिडिओ: मुंबईतील मुसळधार पावस आणि पुरादरम्यान चार व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये काही लोक पाण्यात दारू पिताना, रस्त्यावर बोट डान्स करताना, पाण्यात झोपून जाताना आणि मॉलच्या बाहेर पोहताना दिसत आहेत.
पुणे - फास्टॅग वार्षिक पास योजना पुणे जिल्ह्यातील चार टोल प्लाझांवर सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना एकदा पास घेतल्यावर येथून सहज प्रवास करता येणार आहे. सध्या केवळ कार, जीप आणि व्हॅनसारख्या वाहनांसाठी हा पास देण्यात येत आहे.
मुंबईतील बेस्टच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा दारुण पराभव झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला एकही जागा मिळाली नाही, तर शशांक राव यांच्या पॅनेलने १४ जागा जिंकून सत्ता मिळवली.
mumbai