MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • नोकरदार महिलांसाठी राज्य सरकार “पाळणा योजना” राबवणार, ३४५ पाळणा केंद्रांवर मिळतील या सुविधा

नोकरदार महिलांसाठी राज्य सरकार “पाळणा योजना” राबवणार, ३४५ पाळणा केंद्रांवर मिळतील या सुविधा

मुंबई : राज्यातील नोकरदार महिलांच्या जीवनाला नवी उभारी देणारी आणि त्यांच्या लहान मुलांसाठी सुरक्षित व पोषणयुक्त वातावरण देणारी “पाळणा योजना” महाराष्ट्रात सुरू होत आहे. नोकरदार मातांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी शासन उचलणार आहे.

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Aug 22 2025, 12:19 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
३४५ पाळणा केंद्रे सुरू होतील
Image Credit : Freepik

३४५ पाळणा केंद्रे सुरू होतील

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यभरात ३४५ पाळणा केंद्रे सुरू होतील. यासाठी निधी केंद्र व राज्य शासन अनुक्रमे ६०:४० या प्रमाणात उपलब्ध करून देणार आहे. केंद्र शासनाने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता दिली असून, राज्य शासनाच्या १३ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयानुसार ही योजना लागू होणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
योजनेची वैशिष्ट्ये
Image Credit : Freepik

योजनेची वैशिष्ट्ये

  • ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित देखभाल व डे-केअर सुविधा
  • ३ वर्षाखालील मुलांसाठी पूर्व उद्दीपन, तर ३-६ वर्षे वयोगटासाठी पूर्वशालेय शिक्षण
  • सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी पौष्टिक नाश्ता (दूध/अंडी/केळी)
  • पूरक आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण, वाढीचे नियमित निरीक्षण
  • वीज, पाणी, बालस्नेही शौचालयासह सुरक्षित वातावरण

Related Articles

Related image1
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, या महिन्याचा पगार 26 ऑगस्टलाच, कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफीही
Related image2
Bail Pola 2025 : ''समस्त पुरुष वर्गाला बैल पोळ्याच्या शुभेच्छा'', आज बैल पोळ्यानिमित्त मित्राला, नवऱ्याला पाठवा हे Funny Messages
35
कार्यपद्धती
Image Credit : Gemini

कार्यपद्धती

  • महिन्यातील २६ दिवस, रोज ७.५ तास पाळणा सुरू राहील
  • एका पाळण्यात जास्तीत जास्त २५ मुलांची व्यवस्था
  • प्रशिक्षित सेविका (किमान बारावी उत्तीर्ण) व मदतनीस (किमान दहावी उत्तीर्ण)
  • वयमर्यादा : २० ते ४५ वर्षे, स्थानिक उमेदवारांना प्राधान्य
  • जिल्हास्तरीय समितीद्वारे पारदर्शक निवड प्रक्रिया
45
मानधन / भत्ते
Image Credit : AI Meta

मानधन / भत्ते

  • पाळणा सेविका – ₹५५००
  • पाळणा मदतनीस – ₹३०००
  • अंगणवाडी सेविका भत्ता – ₹१५००
  • अंगणवाडी मदतनीस भत्ता – ₹७५०
55
मुलांना पोषणयुक्त वातावरण मिळेल
Image Credit : AI Meta

मुलांना पोषणयुक्त वातावरण मिळेल

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “या योजनेमुळे मातांना रोजगारात सहजता मिळेल आणि मुलांना सुरक्षित, शिक्षणाभिमुख व पोषणयुक्त वातावरण मिळेल. हा उपक्रम प्रत्येक आईसाठी दिलासा आणि प्रत्येक बालकासाठी भविष्याची हमी ठरेल.”

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ganpati Festival : बीएमसीकडून शाडू मातीचा पुरवठा उशिरा; गणेश मूर्तीकारांमध्ये नाराजी
Recommended image2
Dadar Best Bus Accident : दादर प्लाझा टॉकीजजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, चारहून अधिक जखमी
Recommended image3
Mumbai Weather Update : मुंबईत उकाड्यासोबत पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचा अंदाज
Recommended image4
Mumbai Auto Fare Hike : मुंबईत रिक्षा प्रवास आणखी महागणार; नवीन दर लवकरच लागू होण्याची शक्यता
Recommended image5
Mumbai Weather : मुंबईत पावसाची एन्ट्री, पुढचे ५ दिवस मेघगर्जनेसह सरी; IMD चा अंदाज
Related Stories
Recommended image1
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, या महिन्याचा पगार 26 ऑगस्टलाच, कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफीही
Recommended image2
Bail Pola 2025 : ''समस्त पुरुष वर्गाला बैल पोळ्याच्या शुभेच्छा'', आज बैल पोळ्यानिमित्त मित्राला, नवऱ्याला पाठवा हे Funny Messages
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved