मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
पुढील 48 तासात मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यालाही पाऊस पडणार आहे.
पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीची काही डबे रुळावरून घसरले. बोईसर स्थानकातून मुंबईच्या दिशेने येणारी मालगाडी घसरली. या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबईसह उपनगरात आज हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच ठाणे, रायगड जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहील. त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे.
जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 30 मेपासून पाण्याचा पुरवठा कमी होणार आहे.
Mumbai University PG Admission 2024 : मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आतापर्यंत स्फोट दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू आणि 50 जण जखमी झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही नाईन मराठी चॅनलला बोलताना दिली आहे.
या स्फोटानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत जाणून घ्या.