MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Rain Update: मुंबईतील 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, राज्यात पावसाच्या सरी कोसळणार

Mumbai Rain Update: मुंबईतील 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, राज्यात पावसाच्या सरी कोसळणार

अनंत चतुर्दशी नंतर थांबलेला पाऊस पुन्हा सुरु झाला आहे. शनिवारी दहिसर आणि बोरिवलीत चांगला पाऊस झाला. सांताक्रूझ आणि कुलाबा येथे मात्र पाऊस अजिबात झाला नाही.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Sep 14 2025, 10:30 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Mumbai Rain Update: मुंबईतील 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, राज्यात पावसाच्या सरी कोसळणार
Image Credit : X

Mumbai Rain Update: मुंबईतील 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, राज्यात पावसाच्या सरी कोसळणार

मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असं सांगण्यात आलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
शनिवारी झाला चांगला पाऊस
Image Credit : X

शनिवारी झाला चांगला पाऊस

अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पाऊस थांबला होता पण आता परत एकदा जोरात सुरु झाला आहे. सांताक्रूझ आणि कुलाबा येथे आसपास अजिबात पाऊस झाला नव्हता. त्यानंतर शनिवारी १३ सप्टेंबर रोजी चांगला पाऊस झाला.

35
दहिसर आणि बोरिवलीत झाला चांगला पाऊस
Image Credit : X

दहिसर आणि बोरिवलीत झाला चांगला पाऊस

रविवारी आणि सोमवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, रायगडमध्ये रविवारी आणि रायगड, रत्नागिरीमध्ये सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी दहिसर आणि बोरिवली परिसरात चांगला पाऊस झाला.

45
मुंबईत किती पाऊस झाला?
Image Credit : X

मुंबईत किती पाऊस झाला?

मुंबईत सांताक्रूझ केंद्रावर ०.१ मिलीमीटर एवढा पाऊस पडून गेला आहे. तर, कुलाबा केंद्रावर पावसाची अजिबात नोंद झाली नाही. सप्टेंबरच्या पहिल्या १३ दिवसांमध्ये कुलाबा केंद्रावर जेमतेम ४१.२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. तर, सांताक्रूझ येथे १३३.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

55
मुंबईतील गरमी झाली कमी
Image Credit : Getty

मुंबईतील गरमी झाली कमी

मुंबईतील गरमी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यभरात उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र येथे तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारीही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Road Rage : नवी मुंबईत ओला ड्रायव्हरला रॉडने मारलं, २ किमी बोनेटवरून फरफटत नेलं; व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
FDA Crackdown : शाळा-कॉलेजबाहेरच्या खाऊगल्ल्यांवर FDAचा वॉच, तुकाराम मुंढेंनी दिले कारवाईचे संकेत
Recommended image3
Surrogate Ad : शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफला १० लाखांचा दंड? तुकाराम मुंडेंचा इशारा
Recommended image4
ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठी बातमी! 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू
Recommended image5
मुंबईत FDAचा मोठा दणका! ओटर्स क्लब, झेप्टोच्या गोदामासह 6 ठिकाणांचे परवाने निलंबित
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved