Nitish Kumar took oath 10th times as CM : नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

Nitish Kumar took oath 10th times as CM : नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात इतिहास रचला आहे. त्यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात नवा विक्रम नोंदवला आहे.

गांधी मैदानात आयोजित केलेल्या शानदार समारंभात नितीश कुमार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या ऐतिहासिक शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.

Scroll to load tweet…

या ऐतिहासिक शपथग्रहणाने नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते बिहारच्या राजकारणातील सर्वात स्थायी आणि प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या या विक्रमी शपथविधीने भारतीय राजकारणात एक नवीन नोंद झाली आहे.

देवेंद्र फडणवीसही होते उपस्थित

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर बिहारच्या जनतेने विश्वास दाखवला आहे. नितीश कुमार यांनी गेली ५ वर्षे बिहारमध्ये भरीव काम केले आहे. त्यामुळे ऐतिहासिक विजय झाला आहे.

येथे क्लिक करुन, बघा फडणवीस काय म्हणाले…

अजित पवारांची उपस्थिती

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीन कुमार दहाव्यांदा शपथ घेत आहेत. विधानसभा निवडणुकीत बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. एडीएवर विश्वास दाखविल्याबद्दल मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो. बिहारच्या विकासाला एक वेगळी दिशा मिळेल. नरेंद्र मोदी आणि शाह यांच्या त्यांना पूर्ण सपोर्ट आहे.

YouTube video player

या शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. त्यापूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांची तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. अमित शाह यांनी फडणवीस यांना समज द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याचे वृत्त आहे.