MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • नाशिककरांची चंगळ! आता मुंबई-धनबाद एक्स्प्रेस नाशिक रोडवर थांबणार; प्रवाशांना मोठा दिलासा

नाशिककरांची चंगळ! आता मुंबई-धनबाद एक्स्प्रेस नाशिक रोडवर थांबणार; प्रवाशांना मोठा दिलासा

Mumbai Dhanbad Express Nashik Stop: रेल्वे प्रशासनाने मुंबई ते धनबाद दरम्यान धावणाऱ्या 'हॉलिडे स्पेशल' एक्स्प्रेसला नाशिक रोड रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला. यामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची, मुंबईला जाणाऱ्या नोकरदारांची सोय होणार आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 07 2026, 03:26 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
नाशिककरांची चंगळ! आता मुंबई धनबाद एक्स्प्रेस नाशिक रोडवर थांबणार
Image Credit : Asianet News

नाशिककरांची चंगळ! आता मुंबई-धनबाद एक्स्प्रेस नाशिक रोडवर थांबणार

नाशिक: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्या नाशिककरांसाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते धनबाद दरम्यान धावणाऱ्या 'हॉलिडे स्पेशल' एक्स्प्रेसला आता नाशिक रोड रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला आहे. यामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांचा आणि मुंबईला जाणाऱ्या नोकरदारांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग
Image Credit : ANI

गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग

ही साप्ताहिक विशेष गाडी ८ एप्रिल पासून रुळावर धावणार असून तिचे नियोजन खालीलप्रमाणे असेल.

गाडी क्र. १३३८० (LTT ते धनबाद): ही गाडी दर बुधवारी पहाटे ०४:५५ वाजता मुंबईतून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता धनबादला पोहोचेल.

गाडी क्र. १३३७९ (धनबाद ते LTT): ही गाडी दर सोमवारी सकाळी ११:०० वाजता धनबादहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी ०१:४० वाजता मुंबईत पोहोचेल. 

Related Articles

Related image1
विरार-डहाणूकरांचा प्रवास आता 'सुपरफास्ट'! पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्यांची लोकल; १७ नवीन फेऱ्यांमुळे गर्दीतून सुटका!
Related image2
दहिसर-काशीगाव मेट्रो 9 चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन; मिरा-भाईंदरकरांसाठी प्रवास होणार जलद आणि सुलभ
35
प्रमुख थांबे
Image Credit : Social Media

प्रमुख थांबे

नाशिक रोडसह ही ट्रेन कल्याण, इगतपुरी, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सिंगरुळी आणि रांची रोड अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. 

45
कशी असेल रेल्वेची रचना?
Image Credit : South Western Railways - SWR

कशी असेल रेल्वेची रचना?

प्रवाशांच्या सोयीसाठी या ट्रेनमध्ये सर्व प्रकारचे कोच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

२ सेकंड एसी टियर

२ थर्ड एसी टियर

६ एसी थ्री इकॉनॉमी

६ स्लीपर कोच

४ जनरल कोच आणि २ जनरेटर डबे. 

55
आरक्षण सुरू!
Image Credit : AI Generated Photo

आरक्षण सुरू!

या गाडीसाठीचे बुकिंग ५ एप्रिल पासून सुरू झाले आहे. प्रवासी आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाईटवर किंवा 'RailOne' ॲपद्वारे आपले तिकीट आरक्षित करू शकतात. उन्हाळी सुट्ट्यांमुळे गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी लवकरात लवकर आरक्षण करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Monsoon Update : मुंबईकरांना पावसासाठी आणखी वाट पहावी लागणार? IMD कडून हवामानाचा नवा अंदाज
Recommended image2
मुंबईवर पाणीसंकट; पालिकेनं घेतलेला निर्णय वाचून बसेल धक्का
Recommended image3
Ganpati Festival : बीएमसीकडून शाडू मातीचा पुरवठा उशिरा; गणेश मूर्तीकारांमध्ये नाराजी
Recommended image4
Dadar Best Bus Accident : दादर प्लाझा टॉकीजजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, चारहून अधिक जखमी
Recommended image5
Mumbai Weather Update : मुंबईत उकाड्यासोबत पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचा अंदाज
Related Stories
Recommended image1
विरार-डहाणूकरांचा प्रवास आता 'सुपरफास्ट'! पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्यांची लोकल; १७ नवीन फेऱ्यांमुळे गर्दीतून सुटका!
Recommended image2
दहिसर-काशीगाव मेट्रो 9 चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन; मिरा-भाईंदरकरांसाठी प्रवास होणार जलद आणि सुलभ
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved