Mumbai Weather Update : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात दाट धुके, थंडीची लाट!
Mumbai Weather Update : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि राज्याच्या काही भागांमध्ये तापमान घटले असून, दाट धुके आणि थंडीची लाट जाणवत आहे.
13

Image Credit : X
उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा महाराष्ट्रावर परिणाम
हिमालयातील बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्रात येत आहेत. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पारा ३-४ अंशांनी घसरला आहे. पुढील ४-५ दिवसांत थंडी आणि दाट धुके वाढण्याचा हवामान विभागाचा इशारा आहे.
23
Image Credit : AI Generated
किनारपट्टीवर दमट हवा, तर राज्याच्या आत थंडीचा कडाका
मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मिश्र हवामान राहील. रात्री हलकी थंडी, तर दिवसा दमटपणा जाणवेल. याउलट विदर्भात नागपूर, गोंदिया येथे पारा १०-१२°C पर्यंत घसरू शकतो आणि दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
33
Image Credit : Getty
महाराष्ट्रातील विविध भागांमधील हवामानातील बदल
नाशिक, निफाडमध्ये दाट धुक्यासह थंडी आहे. पुणे आणि परिसरात पारा १३-१५°C पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटक गर्दी करत आहेत. मराठवाड्यातही लवकरच थंडी वाढण्याचा अंदाज आहे.

