- Home
- Mumbai
- Mumbai Traffic Update: मुंबईकरांनो सावधान! ऑफिसला निघण्याआधी ‘हा’ रस्ता टाळा, एलफिन्स्टन ब्रिज बंद; वाहतुकीत मोठे बदल
Mumbai Traffic Update: मुंबईकरांनो सावधान! ऑफिसला निघण्याआधी ‘हा’ रस्ता टाळा, एलफिन्स्टन ब्रिज बंद; वाहतुकीत मोठे बदल
Mumbai Traffic Update: एलफिन्स्टन ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होणार आहे. नवीन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी कनेक्टर प्रकल्पाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, वाहतूक मार्गात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

एलफिन्स्टन ब्रिज बंद; वाहतुकीत मोठे बदल
मुंबई: मुंबईकरांनो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना! एलफिन्स्टन ब्रिजवरील कामामुळे वाहतूक पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे कामावर निघण्यापूर्वी तुमच्या मार्गाचे नीट नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा अनपेक्षित वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता आहे.
एलफिन्स्टन ब्रिज तात्पुरता बंद
परेल आणि प्रभादेवी या पूर्व-पश्चिम दिशांना जोडणारा एलफिन्स्टन ब्रिज 12 सप्टेंबर 2025 पासून रात्री 11:59 वाजता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
नवीन एलफिन्स्टन उड्डाणपूल तसेच शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पाच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) ने या कामासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वाहन चालक
दादर पूर्व - दादर पश्चिम/मार्केट – टिळक ब्रिज वापरा
पटेल पूर्व - प्रभादेवी/लोअर परेल – सकाळी 7:00 ते दुपारी 3:00 पर्यंत करी रोड ब्रिज
परेल/भायखळा पूर्व - वरळी/शिवडी/कोस्टल रोड – चिंचपोकळी ब्रिज
पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वाहन चालक
दादर पश्चिम - दादर पूर्व – टिळक ब्रिज
प्रभादेवी/लोअर परेल पश्चिम - टाटा/केईएम हॉस्पिटल – दुपारी 3:00 ते रात्री 11:00 दरम्यान करी रोड ब्रिज
कोस्टल रोड/सी-लिंक - परेल/भायखळा पूर्व – चिंचपोकळी ब्रिज
महादेव पालव मार्गावर विशेष वाहतूक नियोजन
सकाळी 7:00 ते दुपारी 3:00:
भारत माता जंक्शन - शिंगटे मास्तर चौक एकदिशात्मक वाहतूक
दुपारी 3:00 ते रात्री 11:00:
उलट दिशेने एकदिशात्मक वाहतूक
रात्री 11:00 ते सकाळी 7:00:
दोन्ही दिशांना वाहतूक सुरू राहील
नो पार्किंग झोन घोषित केलेले रस्ते
मा. म. जोशी मार्ग
सेनापती बापट मार्ग (दुहेरी वाहतूक सुरू राहील)
महादेव पालव मार्ग
साने गुरुजी मार्ग
भवानी शंकर मार्ग
रावबहाद्दूर एस.के. बोले मार्ग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग
आपत्कालीन सुविधा उपलब्ध
प्रभादेवी रेल्वे स्थानक (पश्चिम) व परेल स्थानक (पूर्व) येथे
रुग्णवाहिका व व्हीलचेअरची व्यवस्था
MMRDA कडून ही योजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आखण्यात आली असून, कामाच्या काळात अपघाताचे प्रमाण कमी करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
मुंबईकरांनो, वाहतूक नियमानुसारच प्रवास करा!
वाहतूक बदलांची माहिती लक्षात घेऊनच प्रवास करा, जेणेकरून तुमचा वेळ, सुरक्षितता आणि प्रवास नियोजित होईल. अनावश्यक त्रास टाळण्यासाठी या मार्गदर्शनाचे काटेकोर पालन करा.

