Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी कुर्ला स्थानकावर मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. या दरम्यान, एलिव्हेटेड हार्बर स्टेशनसाठी ट्रॅक डायव्हर्जनचे काम होणार आहे. 

मुंबई: मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस, म्हणजेच शनिवार आणि रविवारी मोठ्या मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, सतत वर्दळीच्या आणि प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या कुर्ला स्थानकावर या ब्लॉकच्या दरम्यान अनेक महत्त्वाची कामे पार पडणार आहेत.

कुर्ला येथे एलिव्हेटेड हार्बर स्टेशनसाठी ट्रॅक डायव्हर्जनचे ऐतिहासिक काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे, तर रेल्वेच्या विकासाच्या दृष्टीनेही मोठं पाऊल मानलं जात आहे.

ब्लॉकची वेळ व स्थान

ब्लॉक कालावधी:

शनिवार, रात्री 11:05 ते रविवारी दुपारी 01:05 (एकूण 14 तास 30 मिनिटांचा ब्लॉक)

प्रभावित मार्ग:

वडाळा रोड - मानखुर्द दरम्यान संपूर्ण लोकल सेवा बंद राहणार आहे.

कोणकोणत्या सेवा राहतील रद्द?

शनिवार, रात्री 10:20 ते रविवार, दुपारी 02:19:

सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन हार्बर लोकल्स रद्द करण्यात येणार आहेत.

शनिवार, रात्री 10:07 ते रविवार, दुपारी 12:56:

पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल्स बंद राहतील.

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल:

सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणारी शनिवारी रात्री 10:14 वाजता सुटेल.

ब्लॉकनंतरची पहिली लोकल:

सीएसएमटीहून रविवारी दुपारी 01:30 वाजता सुटेल.

पर्यायी व्यवस्था काय?

ब्लॉकच्या दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष लोकल सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक

स्थानक: ठाणे ते कल्याण

वेळ: रविवार, सकाळी 09:00 ते दुपारी 01:00

पाचव्या आणि सहाव्या मार्गांवर काम होणार असून, यामुळे सीएसएमटी आणि एलटीटीहून सुटणाऱ्या 18 एक्स्प्रेस गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वेवरही परिणाम

पश्चिम रेल्वेवरील मेमू ट्रेन्स 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील.

वसई रोड - दिवा मेमू गाडी केवळ कोपर स्थानकापर्यंत धावणार आहे (09:50 ची सेवा).

तुमच्यासाठी सूचना

बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करण्याआधी वेळापत्रक तपासा आणि पर्यायी मार्गांचा वापर करा. रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेली कामं ही भविष्यातील सेवा सुधारण्यासाठीच आहे, याची नोंद ठेवा.