MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Rains : मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर कायम, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी

Mumbai Rains : मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर कायम, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीत पावसाने चांगलीच बॅटिंग सुरू ठेवली आहे. मागच्या काही दिवसांपासून ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावलीय.आज, २१ जुलै, सोमवारचा पावसाचा अंदाज वाचा.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : Jul 21 2025, 08:51 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईतील पावसाची स्थिती
Image Credit : Social Media

मुंबईतील पावसाची स्थिती

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस कोसळत आहे. आज, २१ जुलै, या दिवशीही या भागांमध्ये पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये हलक्याशा सरींचं प्रमाण कमी झालं असलं तरी, दमट हवामान आणि वाढलेला उकाडा नागरिकांना त्रस्त करत आहे. ढगाळ वातावरणामुळे ऊन-पावसाचा लपंडाव सुरू आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
दुपारनंतर वाढणार पावसाचा जोर
Image Credit : Social media

दुपारनंतर वाढणार पावसाचा जोर

मुंबई शहर आणि उपनगरात काल रविवारी पावसाने जबरदस्त हजेरी लावली होती. आज सकाळपासूनही आकाश पूर्ण ढगांनी भरलेलं असून, दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हवामान अधिकच दमट वाटत आहे. आज मुंबईत कमाल तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी यलो अलर्ट देखील दिला आहे.

Related Articles

Related image1
Mumbai Weather Update: मुंबईसह कोकणात पावसाची रिपरिप, आद्रता असल्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं केलं अवाहन
Related image2
Ganpati Special Trains 2025: कोकण रेल्वेच्या 11 विशेष गाड्या, वेळापत्रक, थांबे, बुकिंग कधीपासून जाणून घ्या एका क्लिकमध्ये
35
ठाणे आणि नवी मुंबईतील स्थिती
Image Credit : Social Media

ठाणे आणि नवी मुंबईतील स्थिती

ठाणे आणि नवी मुंबईत काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. आजही या भागांमध्ये हलक्याशा ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, काही भागांत रिमझिम पाऊस सुरू आहे. ठाणे आणि नवी मुंबई परिसरात कमाल तापमान सुमारे ३० अंश, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस आहे. या भागांनाही यलो अलर्ट दिला गेला आहे.

45
पालघरमधील पावसाचा अंदाज
Image Credit : Social Media

पालघरमधील पावसाचा अंदाज

पालघर जिल्ह्यात मात्र आज सकाळपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. काही भागात हलक्याशा सरी पडल्यात, पण जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. ढगाळ वातावरण असून, दमट हवामानामुळे ग्रामीण भागात उकाडा अधिक जाणवत आहे. आज पालघरमध्ये कमाल तापमान २९ अंश, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतकं राहील.

55
कोकणातील स्थिती
Image Credit : Social Media

कोकणातील स्थिती

कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाचा अनुभव आला आहे. आजही या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ढगाळ वातावरण आणि दमट हवामान असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. समुद्रकिनाऱ्यालगत वाऱ्याचा जोर आणि दमटता अधिक आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाताना हवामान खात्याच्या सूचनांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Crime : पेन किलरच्या नावाखाली उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या, मुंबईत भयंकर प्रकार समोर
Recommended image2
TET Exam Paper Leak : टीईटी पेपर लीकप्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, एअरपोर्ट परिसरातून तिघांना अटक
Recommended image3
Raj Thackeray : ... तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा; राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका
Recommended image4
Mumbai Crime : लोकलमधील हत्येनंतर पुन्हा चाकूहल्ला; माहिम स्टेशनबाहेर किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला
Recommended image5
TET Exam : 'टीईचा'चा पेपर फुटला, राज्यभरात उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलली
Related Stories
Recommended image1
Mumbai Weather Update: मुंबईसह कोकणात पावसाची रिपरिप, आद्रता असल्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं केलं अवाहन
Recommended image2
Ganpati Special Trains 2025: कोकण रेल्वेच्या 11 विशेष गाड्या, वेळापत्रक, थांबे, बुकिंग कधीपासून जाणून घ्या एका क्लिकमध्ये
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved