एक कार्ड, अनेक प्रवास!, 'Mumbai 1' स्मार्ट कार्डचे आगमन
मुंबईत 'Mumbai 1' स्मार्ट कार्ड आले! लोकल, मेट्रो, बससाठी एकच कार्ड वापरा. टॅप करा आणि जलद, सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या.
- FB
- TW
- Linkdin
)
फक्त एका कार्डने लोकल, मेट्रो आणि बस प्रवास होणार सुलभ!
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल आणि बससाठी वेगवेगळ्या तिकिटांची गरज नाही. फक्त एकच कार्ड, ‘Mumbai 1’!
ट्रेन, मेट्रो, बस, सर्वांसाठी एकच कार्ड
‘Mumbai 1’ कार्ड वापरून तुम्ही लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल आणि BEST बस मध्ये सहज प्रवास करू शकता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या तिकिटांची गरज नाही.
टॅप करा आणि प्रवास सुरू!, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
हे कार्ड टॅप-टू-पे (Tap to Pay) प्रणालीवर चालते. तिकीट खिडकीवर रांगा नाहीत, फक्त एक टॅप करा आणि पुढे चला. प्रवास आणखी जलद आणि सोयीचा!
अॅप द्वारे बुकिंग आणि कार्ड सुरक्षा
Metro Line 1, 2A आणि 7 साठी वापरात असलेल्या अॅपद्वारे कार्ड वापरता येईल. कार्डमध्ये चिप संरक्षण असल्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहतो.
राज्य सरकार आणि स्टेट बँकेचा संयुक्त उपक्रम
हे कार्ड स्टेट बँक ऑफ इंडिया आणि MMRDA च्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. हे प्रीपेड कार्ड आहे आणि 'पे-अॅज-यू-गो' प्रणालीवर चालते.
कार्ड हरवल्यास काय करावे?
जर कार्ड हरवले किंवा खराब झाले, तर ₹100 भरून नवीन कार्ड मिळू शकते. कार्डवर वैधता मुद्रित असेल आणि तुमचं बॅलन्स सुरक्षित राहील.
AC लोकल ट्रेनसह प्रवासाचा अनुभव होईल थंड!
साथच नवीन 238 एसी लोकल ट्रेन देखील लवकरच येणार आहेत. दोन टप्प्यांत या गाड्या सुरू होतील आणि जुने नॉन-AC लोकल गाड्या बदलल्या जातील.