मुंबई महापालिका निवडणूक २०२५–२६ साठी मतदारांना आपले नाव, मतदान क्रमांक आणि बूथ क्रमांक शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अधिकृत लिंक शेअर केली आहे. या ऑनलाइन सुविधेमुळे मतदान प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि सुकर होणार आहे.

Mumbai Municipal Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, मतदान क्रमांक (Voter ID / Serial Number) आणि बूथ क्रमांक सहजपणे शोधता यावा, यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) आपल्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवर एक उपयुक्त लिंक शेअर केली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी होणारा गोंधळ टाळण्यास मदत होणार आहे.

मतदार यादीतील नाव कसे शोधाल?

मुंबई महापालिकेने शेअर केलेल्या लिंकच्या माध्यमातून मतदार काही सोप्या स्टेप्समध्ये आपली माहिती तपासू शकतात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर मतदारांना आपले नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC Number) टाकून शोध घेता येतो. यामधून मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे लगेच स्पष्ट होते.(How to check name in voter list)

मतदान क्रमांक आणि बूथ क्रमांकाची माहिती

या ऑनलाइन सुविधेमुळे केवळ मतदाराचे नावच नव्हे, तर त्याचा मतदान क्रमांक (Serial Number) आणि नेमका मतदान केंद्राचा (Booth) पत्ता देखील उपलब्ध होतो. मतदानाच्या दिवशी योग्य मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी मतदान केंद्र शोधण्याचा त्रास टळणार आहे.

ट्विटरवर शेअर केलेली अधिकृत लिंक

मुंबई महापालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही लिंक शेअर करण्यात आली असून, नागरिकांनी फक्त अधिकृत स्त्रोतावरूनच माहिती तपासावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. चुकीच्या किंवा बनावट लिंकपासून दूर राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत थेट आणि वेगाने माहिती पोहोचवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

मतदानासाठी आधीच तयारी करण्याचे आवाहन

महापालिका प्रशासनाने सर्व मतदारांना मतदानाच्या आधीच आपली माहिती तपासून ठेवण्याचे आवाहन केले आहे. मतदार यादीत नाव नसेल किंवा माहिती चुकीची असल्यास तात्काळ संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. यामुळे मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही.

Scroll to load tweet…